चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---
सहकार क्षेत्रातील निवडणुकीची पहिली पायरी म्हणजे ग्रामीण भागातील शेतकर्यांना पतपुरवठा करणारी सेवा सहकारी सोसायटी होय. पळसखेड येथील सेवा सहकारी संस्थेवर सर्व उमदेवारांची अविरोध निवड झाल्याने भाजपाने वर्चस्व कायम ठेवले आहे.
पळसखेड येथील सेवा सहकारी संस्था र.नं. ९६८ ची अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड आज ग्रामपंचायत कार्यालयात शांततेत पार पडली. यामध्ये निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यामधून अध्यक्ष व उपाध्यक्षांनी बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये एकूण बारा सदस्यांपैकी भाजपाला आठ तर काँग्रेसचे चार उमदेवारांपैकी भाजपाचे अध्यक्ष म्हणून अरुण देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी रामराव मते यांची निवड करण्यात आली. यामध्ये भाजपाचे तुकाराम खोबरे, शंकर थोटे, मंगला देशमुख, गुलाब पुंड, मुकिंद पुंड, जगदिश सामध या सदस्यांपैकी यांनी अध्यक्षांना अनुमोदन दिले व कॉंग्रेसच्या सदस्य कुसूम डोलारे, प्रेमीला गाढवे, भीमराव गारपाडे, प्रेमीला करवाडे, दिवाकर जुमडे हे सदस्य उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सर्व श्री रवी उपाध्ये, जिल्हाकार्यकारिणी सदस्य संजय पुणसे, प्रमोद अडसड, अमोल अडसड, छोटू देशमुख, पुरुषोत्तम पारधी, रूपराव शेलोकार, महादेव बुरडे, मूकबधिर पठाण, बंडू प्रधवान, बबलू पठाण, अनंत देशमुख, छोटू शेख, प्रकाश पारस्कर, मनीष जगनाडे, ओम गाढवे आदींनी अभिनंदन केले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक कार्यालय चांदूर रेल्वे येथील दहीकर, व्ही. आर. गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment