अनिल चौधरी ,पुणे :-
पोलादपूर (अमोल मराठे यांसकडून )-
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरनजिक लोहारे येथील
पेट्रोलपंपासमोर रविवारी दुपारी सव्वातीन वाजता स्वीफ्ट आणि वॅगनआर
समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वॅगनआरमधील भाऊ-बहिणींचा जागीच मृत्यू
झाला तर या अपघातात दोन्ही वाहनांतील
8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींमध्ये 3 महिला आणि 4पुरूषांसह एका दीड वर्षाचा बालकाचा समावेश आहे.
देवगड येथून प्रसाद मेघश्याम मागनाद हे मुंबईकडे वॅगनआर कार
(क्र.एमएच02एव्ही4580)चालवित निघाले असता मुंबईकडून भरधाव वेगाने येणारी
स्वीफ्ट कार (क्र.एमएच01 एएच6963) घेऊन नाशिक येथील संदीप यशवंत
सहस्त्रबुध्दे हे चिपळूणकडे जात होते. लोहारमाळ पेट्रोलपंपासमोर मुंबई गोवा
राष्ट्रीय महामार्ग रूंद असल्याने कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न चालविला होता. यामुळे स्वीफ्ट आणि वॅगनआर कारची
समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅगनआर कारमधील चालक
प्रसाद मेघश्याम मागनाद यांच्यासह त्यांची बहिण रेश्मा मिलींद नरवटे हे
जागीच ठार झाले. तर अन्य मिलींद वामन नरवटे, शृती प्रसाद मागनाद आणि शृतीचा
दीड वर्षांचा मुलगा शौर्य प्रसाद मागनाद हे गंभीररित्या जखमी झाले.
वॅगरआरमधील सर्वजण डोंबिवली येथे जात होते. स्वीफ्ट कारमधील संदीप यशवंत
सहस्त्रबुध्दे, चित्रा संदीप सहस्त्रबुध्दे व अनिकेत संदीप सहस्त्रबुध्दे
(रा.नाशिक) आणि लक्ष्मी राजेंद्र कुलकर्णी आणि पियुष राजेंद्र कुलकर्णी
(रा.सुरत) हे पाच जण जखमी झाले.
अपघाताची खबर मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी जाऊन
अपघात ग्रस्तांना त्वरित बाहेर काढून उपचारांसाठी पोलादपूर सरकारी
रुग्णालयात दाखल केले .
पोलीस उपनिरिक्षक बी.टी.महाजन, पोलीस शिपाई गोविलकर, वाहतूक
पोलीस विश्राम गुंजाळ, बढे तसेच अन्य कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.
पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाची108 रूग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचेपर्यंत
वाहतुकीचा खोळंबा होऊन ट्रॅफिक जॅम झाले. त्यामुळे पोलीस व सिद्धेश
पवार ,सनी विचारे , तुषार पवार व अन्य प्रवासी अपघाताग्रस्ताना बाहेर
काढण्यासाठी व वाहनांतून रूग्णवाहिकेमध्ये हलविण्यापासून वाहतूक सुरळीत
करण्यासाठी सहकार्य केले. यानंतर ग्रामीण रूग्णालयामध्ये डॉ.राजेश
सलागरे,डॉ.आदिती भालेराव,डॉ.राठी यांनी जखमींवर तातडीने उपचार सुरू करून
सर्व जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथे रवाना केले.
रविवारी दुपारी कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठया संख्येने असल्याने तीनपेक्षा अधिक वाहने एकाच बाजूने मुंबईकडे जात होती तर मुंबईकडून कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी पुरेसा रस्ता शिल्लक न राहिल्याने अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
रविवारी दुपारी कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठया संख्येने असल्याने तीनपेक्षा अधिक वाहने एकाच बाजूने मुंबईकडे जात होती तर मुंबईकडून कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी पुरेसा रस्ता शिल्लक न राहिल्याने अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
मुंबई – गोवा महामार्गावर वारंवार अपघात हे वाहनचालकांच्या
चुकांमुळे होत असतात .अशावेळी महामार्ग सहाय्यक पोलीस निरिक्षक ठाकूर साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अपघात घडू नयेत म्हणून प्रयत्न करत
असतात , परंतु काही उत्साही वाहनचालकांना ओहरटेक करून पुढे जाण्याची खूप
घाई झालेली असते , यामुळेच असे काही अपघात घडत असल्याचे श्री ठाकूर यांनी यावेळी
सांगितले .
महामार्गावर अपघात घडल्यास महामार्ग पोलीस प्रथम अपघात
ग्रस्तांना त्वरित पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करुण लगेचच वाहतूक
सुरळीत करत आहेत ,तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील लगेचच संपर्क
करुण पंचनामा करण्यास कळवीत आहेत.
अपघात ग्रस्तांना त्वरित उपचारांसाठी
रूग्णालयात दाखल केल्यामुळे आतापर्यंत अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत .
यामुळे महामार्ग परिसरात सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री ठाकूर साहेब , पोलीस
हवालदार श्री राजू चव्हान , मोरे , पोलीस नाईक कदम ,राणा , व श्री एन. टी . कुटे
यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
Post a Comment