अमरावती /--- : आज स्थानिक अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या शेंडगाव (खासपूर) येथील संत गाडगेबाबांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावर मा मुख्यमंतत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते संपन्न झाले यांनी अमरावती ते शेंडगाव या दरम्यान जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी सुद्धा केली. अमरावती चे
पालकमंत्री श्री प्रविण पोटे-पाटील यांच्यासह आ.रमेश बुंदिले, आ.प्रभादास भिलावेकर, मोर्शी चे आ.डॉ.अनिल बोंडे, अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, अमरावती जिल्हाधिकारी श्री किरण गित्ते, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनिल पाटील, उपविभागीय अधिकारी श्री प्रविण ठाकरे, उप विभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी भातकुली तालुक्यातील मधलापूर येथील अंबाडा नाला वरील गॅबीयन बंधारा खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी केली. नदी, नाले पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थिलोरी या गावातील वैशाली शालीकराम धर्माळे यांच्या शेतात मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या ३० बाय ३० बाय ३ या शेततळ्याची पाहणी केली. शेतकरी धर्माळे यांनी शेततळ्याच्या उपयुक्ततेबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. नुकत्याच झालेल्या एक दिवसाच्या पावसात या शेततळ्यात थोडे पाणी साठले होते. त्यानंतर त्यांनी पालकमंत्री पांदण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील पांदण रस्त्याचीही पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांनी दर्यापूर तालुक्यातील थिलोरी या गावी कृषि विभागाच्यावतीने मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत एकाच गावातील ८० शेततळ्यांची मालिकेची दुर्बिण मधून पाहणी केली. खारपाणपट्ट्यात शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन घेऊन बागायती शेती करण्यासाठी हमखास उपाय असलेल्या शेततळे उपयुक्त असल्याबद्दल सर्व सहभागी शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या वर्षाच्या पावसाळ्यात या शेततळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठविण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. -
Sunday, May 8, 2016
संत गाडगेबाबांच्या अर्धाकृती पुतळ्याच मुख्यमंत्र्यांचा हस्ते अनावरण
Posted by vidarbha on 9:51:00 PM in Amravati News | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment