चंद्रपूर / प्रवीण गोंगले /---
पत्नीला शारिरिक व मानसिक त्रास देउन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या आरोपी पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीशानी 7 मे रोजी शिक्षा सुनावली आहे. धम्मपाल दशरथ काशीदे असं आरोपी पतीचं नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील रहिवासी उत्तम मोगले यांच्या जयश्री नामक 20 वर्षीय मुलीचा राजुरा येथील पेठवार्ड निवासी 29 वर्षीय धम्मपाल काशीदे याचेशी झाला. या विवाहाच्या वेळी जयश्रीच्या वडिलानं धम्मपाल याला लग्नात 1 लाख रुपये नगद राशी आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली.
पण त्यानंतरही तो जयश्रीला वडिलांकडुन 50 हजार रुपये आणण्याच्या कारणावरुन तिचा शारीरिक व मानसिक छळ करु लागला. त्याच्या या सततच्या छळामुळं कंटाळलेल्या जयश्रीनं 7 फेब्रुवारी 2013 रोजी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. या घटनेनंतर जयश्रीच्या वडिलानं धम्मपाल विरोधात शारिरिक व मानसिक त्रास देउन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात नोंदविली.
या तक्रारीनुसार पोलिसानी गुन्हा नोंदवुन या प्रकरणाचा अधिक तपास केला आणि त्यानंतर आरोपी धम्मपाल विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. दरम्यान, 7 मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के एल व्यास यानी याप्रकरणी साक्षीदार तपासुन प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे गुन्हा सिध्द केला.
या गुन्ह्यात न्यायाधीशानी धम्मपाल या आरोपी पतीस कलम 304 ब नुसार 9 आणि कलम 498 अ नुसार 3 वर्षाची शिक्षा तसंच, 5 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त शिक्षा सुध्दा न्यायाधीशानी सुनावली आहे. या प्रकरणी सरकारतर्फे अॅड. जयंत साळवे यानी बाजु मांडली.
Post a Comment