चांदुर रेल्वे / शहेजाद खान /---
स्थानिक नगरपरीषद संपुर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. नगरपरीषदमधील भ्रष्टाचाराविरोधातील सद्यस्थीतीत विहिरीतील टांगते आंदोलन सगळीकडेच गाजले आहे. अशातच शहरातील इतर समस्या मात्र जैसे थे आहे. शहरातील नाले सफाईकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे..
सविस्तर वृत्त असे की, शहरातील जुना मोटर स्टैंड स्थित मुत्रीघरापासुन ते रॉय यांच्या घरापर्यंतचा मोठा नाला तसेच उर्दु स्कुलजवळील नाला व इतर नाल्याची साफसफाई जवळपास 6-7 महिन्यांपासुन करण्यात आलेली नाही. या मोठ्या नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, कचरा जमा झालेला असुन नाल्यातील दुर्गंधाचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. तसेच नाल्यांमध्ये झाडेझुडपे सुध्दा वाढलेली आहे. मात्र नालासफाईकडे नगरपरीषदेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आहे. शहरातील नाल्यांची साफसफाई जुनच्या पहिले करने अत्यंत महत्वाचे आहे. याच्या अनेक तक्रारी नगरपरीषदेत करूनही या महत्वाच्या समस्येकडे नप ने लक्ष दिलेले नाही..
त्यामुळे शहरातील सर्व मोठ्या नाल्यांची साफसफाई येत्या जुनच्या पहिलेच तात्काळ करावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
Post a Comment