शेगांव(मनोजकुमार वर्मा )
---
शेगांव
रेल्वे स्थानकाला अ दर्जा प्राप्त असुन शेगांव हे संत नगरी प्रमाणेच
आनंद सागरमुळे पर्यटन स्थळ झाल्याने लाखो भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी
शेगांव शहरात नेहमीच दाखल होते यामुळे रेल्वे प्रशासनाला आर्थिक फायदा होत
असल्याने रेल्वे प्रशासनानेे शेगांव रेल्वे स्थानकास अ दर्जा दिला आहे.
भाविकांची व पर्यटकांच्या सोयीकरीता नवीन पादचारी पुलाचे काम जोमात सुरु
असुन लवकरच सेवेत रुजु करणार असल्याची माहिती शिवसेनेचे श्री दिनेश शिंदे यांनी
दिली. श्री दिनेश शिंदे हे रेल्वे विभागाचे अधिकृत पदाधिकारी असुन ते खासदार
श्री प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय मानल्या जातात
शेगांव
रेल्वे स्थानकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.
काल जनसमुहशी बोलतांना त्यांनी सांगितले की हया महिन्यातच सदर पुलाचे
लोकार्पण करण्याकरीता संबधित रेल्वे विभागाला कळविले आहे. अंतिम काम पुर्ण
झाल्याबरोबर हया पुलाचे लोकार्पण करण्यात येईल.
Post a Comment