बुलडाणा/ महेंद्र मिश्रा /- :-
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मालठाना एकाच आदिवासी शेतकरी कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.
संग्रामपूर तालुक्यातील मालठाणा या गावातील एकाच कुंटुबातील चार शेतकरयानी सततची नापीकी व कर्जबाजारीपणामुळे चौघांनी विष प्राशन केल्याची घटना दिनांक 11 मे च्या रात्री 11 वाजेदरम्यान घडली यामध्ये या कुटुंबातील तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असुन याच कुटंबातील 75 वर्षीय वृध्दाची प्रकृती अत्यवस्थ असुन त्याच्यावर अकोला येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत विष प्राषण करून एकाच कुटुंबातील विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या मृतकांची नावे 1) दिनेश नानसिंग मनाने वय 35
2) लक्ष्मी भावसिंग मसाने 40
3) सुरेश भावसिंग मसाग वय 18
व याच कुटुंबातील नानसिंग सित्तु मसाने वय 75 या वृध्द शेतकरयाने या तिघासोबत विष प्राषन केले असुन त्याची प्रकृती अत्यवस्थ असुन त्याच्यावर अकोला येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत
Post a Comment