BREAKING NEWS

Wednesday, June 15, 2016

मुख्याधिकारी ठाकरे यांनी खोट्या पद्धतीने लिहिले सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग - तर चर्चा न करताच नगराध्यक्षनि केले 12 हि विषय बहुमताने मंजूर - *** जनतेचा पैश्यांची उधळपट्टी होऊ देणार नाही - श्री नितीन गवळी ***

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---

स्थानिक नगरपरिषद मधील प्रत्येक सभा हि नेहमी गाजत असतेच अशातच मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये  मुख्याधिकारी श्रीमती ठाकरे यांनी चक्क सभेचे प्रोसेडींगच खोट्या पद्धतीने लिहिले तसेच सभेतील 12 विषयांवर चर्चा न करता केवळ बहुमताने नगराध्यक्षनि मंजूर केल्याचा आरोप नगरसेवक श्री नितीन गवळी यांनी केला असून जनतेचा पैशाची उधळपट्टी होऊ देणार नाही असा इशाराही नितीन गवळी यांनी दिला आहे. मंगळवारी नप मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते   यामध्ये विरोधी पक्ष  LED मुद्यावर आक्रमक झाले होते या मुद्यावर सभेमध्ये चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाचा नगर सेवकांनी केली होती कारण या आधीचा सभेमध्ये पीठासीन अध्यक्षांनी  प्रोसेडींग वर लिहून दिले होते कि  पुढील सभेत LED चा मुद्यावर चर्चा करण्यात येईल मात्र हा विषय जाणीवपूर्वक टाळून सभागृहाची दिशाभूल केली त्यामुळे यावेळी गोंधळ निर्माण झाला अशावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर अध्यक्षांचे सभेवरून नियंत्रण सुटले यावेळी त्यांनी सभा तहकूब न करता  12 हि विषय  बहुमताने मंजूर केले  व तुमची विरोधकांची गरज नाही  , तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा आमचे काही बिघडत नाही म्हणून सभागृहांबाहेर गेले. यामध्ये दुर्भाग्याची बाब अशी कि  या सभेचे प्रोसेडींग  मुख्याधिकारी ठाकरे यांनी खोट्या पद्धतीने लिहिले कारण ज्या विषयावर सभागृहात चर्चा झालीच नाही ते विषय मुख्याधिकारी यांनी प्रोसिडिंग मध्ये लिहून सभागृहाचा विश्वास गमावला. सदर मुख्याधिकारी आल्या तेव्हापासून नेहमीच पक्षपात करीत आहेत या सभेत मुख्याधिकारी यांचाकडून अस वागणे अपेक्षित नसल्याचे स्पष मत नगरसेवक श्री नितीन भाऊ गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केल आहे .  त्याच बरोबर Advance Post Graduate Diploma In Arban Managment या कोर्स करिता मुख्याधिकारी यांना प्रशिक्षण करिता तब्बल 3 लक्ष रुपये मंजूर करण्याचे व तेही नप फंडातून देण्याचे षड्यंत्र  सत्ताधिकारी यांनी केली आहे  सदर विषयाला श्री नितीन गवळी यांनी जोरदार विरोध केला आहे कारण सत्ताधिकारी यांनी या अगोदर चे मुख्याधिकारी  खवले यांचा ट्रेनिंग चा विषय फेटाळला होता . मात्र नवीन मुख्याधिकारी श्रीमती ठाकरे यांना तेच लोक त्याच कामासाठी कसे काय मंजुरात देत आहेत  असा गंभीर प्रश निर्माण झाला आहे . या दरम्यान LED प्रकरण या मुख्याधिकारी यांनी मार्गी लावले व त्याची बिले तातडीने काढले तर त्याचे बक्षीस तर मुख्याधिकारी यांना नगराध्यक्ष देत तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे.vidarbha24news
सदर निधी हा नागरिकांचा खिशातून येणारा पैसा आहे . नागरिकांचा घामाचा पैसा आहे तो चांदूर रेल्वे येथील विविध समस्यांचा निराकरण साठी आहे. नागरिकांचा पैसा कोणाचा खासगी ट्रेनिंग वर खर्च होता कामा नये . या पैश्यांची उधळपट्टी होऊ देणार नाही असा इशारा नगरसेवक श्री नितीन भाऊ गवळी यांनी दिला आहे.  या विषयावर  सर्व श्री विरोधी नगरसेवक नितीन गवळी सुरेश यादव  मेहमूद हुसेन , सर्व सौ राजेश्री खवड , शीतल गायगोले , रेखाताई नागणे , प्रमिलाताई गणेडीवाल  आदींनी सभागृहातच सदर प्रकरणाला विरोध केला.

Chandur Relwe Letest News


Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.