BREAKING NEWS

Thursday, June 30, 2016

अंधेरीत मेडीकल दुकानाला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू एकाच कुटुंबातील पाच ते सहा जणांचा मृत्यू,

मुंबई: -( शहेजाद खान) -
मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात, एका मेडीकल स्टोअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ
जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. सकाळी 6.18 वाजता अंधेरी पश्चिमेतील जुहू गल्ली येथील मेडीकल दुकानाला आग लागली होतीत. दरम्यान, या अग्निशमन दलानं तासाभरातच या आगीवर नियंत्रण मिळवलं.
आग विझविण्यासाठी ३ फायर इंजिन, २ टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. मेडीकल दुकानाला लागलेली आग ही इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरही पसरली होती. आग फार मोठी नसल्याचं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे. पण या आगीमुळे गुदमरुन आठ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता अग्निशमन दलानं वर्तवली आहे.
अग्निशमन दलानं होरपळलेल्या नागरिकांना वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. तर 1 व्यक्ती गंभीर जखमी
झाली असून त्याच्यावर सध्या उपाय सुरु आहेत. दरम्यान या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.