दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनवर चिखलफेक
करणार्या आशिष खेतान यांना आपचे भिवंडी (जिल्हा ठाणे)
येथील कार्यकर्ते श्री. अनुप कुमार शुक्ल यांचा घरचा अहेर !
देहलीतील आपचे नेते तथा स्वयंघोषित पत्रकार आशिष खेतान हे
दाभोलकर हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ सनातनवर सातत्याने चिखलफेक करत
आहेत. सनातनचे हिंदुत्वाचे कार्य चांगल्यापैकी जाणून असलेले आपचे
कार्यकर्ते श्री. अनुप कुमार शुक्ल हे खेतान यांच्या या सनातनद्वेेषामुळे
कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी आशिष खेतान यांना खरमरीत पत्र लिहून त्यांचा
हिंदुविरोधी तोंडवळा उघड केला आहे. श्री. शुक्ल यांनी हिंदीतून लिहिलेल्या
पत्राचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे. आशिष खेतान,
माझे नाव अनुप कुमार शुक्ल आहे. मी आम आदमी पक्षाचा भिवंडी (पूर्व), जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील सदस्य आहे तथा भिवंडीचा संयोजक होतो. नुकतेच आपण सनातन संस्थेवर केलेले आरोप कानावर आले. ऐकून दु:ख झाले; कारण आपण सनातन संस्थेवर केलेले आरोप तथ्यहीन आणि मिथ्या आहेत.
मी गेल्या एक वर्षापासून सनातन संस्थेचे कार्य अतीसूक्ष्मपणे पहात आहे. त्यांच्या आंदोलनात किंवा भाषणात कुठल्या धर्माचे नाव घेऊन त्यांच्यावर आरोप करतांना मी पाहिलेले नाही. ते केवळ त्यांची हिंदुत्वाची बाजू सर्वांसमोर मांडतात आणि तो त्यांचा अधिकार अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण एक राजकीय पक्ष आहोत. आपण राजकीय पक्षांसमवेतच लढले पाहिजे, धार्मिक संस्थांशी नव्हे. सनातनच्या विरोधात आपल्याकडे जर काही पुरावे असतील वा साक्ष असेल, तर ते आपण पोलीस प्रशासन अथवा सन्मानीय न्यायालयाला द्यावेत. ते संविधानिक स्तरावर अधिकृत आहे. ते त्यावर कार्यवाही करतील. तुम्ही कोणत्या संविधानिक अधिकारान्वये प्रसारमाध्यमांद्वारे ही मागणी करत आहात ?
अन्य धर्माविषयी आग ओकणार्या एम्आयएम् प्रमुख ओवैसी बंधूंचे भाषण तर तुम्ही ऐकलेच आहे. त्यावर तुम्ही निवडणूक आयोगाकडे त्या पक्षाची मान्यता रहित करण्याची मागणी केली ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देश तोडणार्या जेएन्यूतील विद्यार्थ्यांच्या मागे तुम्ही उभा राहिलात. देहलीपासून अवघ्या १५० कि.मी. अंतरावर असणार्या कैराना येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात तुम्ही कधी आवाज नाही उठवला. माझे हे वैयक्तिक मत आहे की, तुम्ही काँग्रेसप्रमाणे धर्मनिरपेक्षतेविषयी दुटप्पी भूमिका घेऊन हिंदुविरोधी राजकारण करू नये. आपल्याला खरोखरच धर्मनिरपेक्ष राहून अन्यायकारक आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढले पाहिजे, धार्मिक संस्थांविरुद्ध नव्हे. आपल्याला देहलीकरांनी आणि भारतातील अन्य नागरिकांनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी पाठिंबा दिला आहे. लांगूलचालनाचे राजकारण वा धार्मिक संस्थांविरुद्ध लढण्यासाठी नव्हे !
आपला कार्यकर्ता, अनुप कुमार शुक्ल, भिवंडी (पू) विधानसभा, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.
श्री. अनुप कुमार शुक्ल यांनी त्यांच्या पत्रात
पुढील सूत्रांद्वारे आशिष खेतान यांचे खरे स्वरूप उघड केले !
- आशिष खेतान यांनी कधी एम्आयएम् पक्षाची मान्यता रहित करण्याची मागणी केली नाही !
- खेतान यांनी देश तोडणार्या जेएन्यूतील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला !
- खेतान यांनी कैराना (उत्तरप्रदेश) येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला नाही !
Post a Comment