पुणे - मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र
सेनेचे धनंजय देसाई यांना वैद्यकीय सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी विशेष
जिल्हा न्यायाधीश जे.टी. उत्पात यांनी येरवडा कारागृह अधीक्षकांना कारणे
दाखवा नोटीस बजावली आहे.
१. २७ जून या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी धनंजय देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाला तक्रार करतांना सांगितले की, त्यांचा डावा हात दुखत असल्याने एम्आर्आय ही वैद्यकीय पडताळणी करणे आवश्यक आहे. याविषयी कारागृह प्रशासनाला न्यायालयीन आदेशाद्वारे आणि अन्य प्रकारे वारंवार सांगूनही कारागृहातून केवळ वेदनाशामक गोळ्या दिल्या जात आहेत.
२. या वेळी देसाई यांचे अधिवक्ता मिलिंद पवार यांनी न्यायालयात आवेदन प्रविष्ट केले. त्यामध्ये कारागृह प्रशासनाने न्यायालयीन आदेशाचे पालन न करणे, देसाई यांची ससून रुग्णालयात तात्काळ एम्आर्आय वैद्यकीय पडताळणी करणे आणि त्यांना चांगले वैद्यकीय उपचार न देण्याविषयी कारागृह अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवून घेण्यात यावा, अशा मागण्या केल्या. त्यावर न्यायालयाने उपरोक्त नोटीस बजावली.

Post a Comment