चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान /--
आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू
महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी
शाळेच्या पहिल्या दिवशी वर्ग पाचवीच्या सर्व विद्यार्थिना शालेय गणवेश, नोटबुक,
पाठ्यपुस्तकाचे वाटप केले.तसेच सर्व विद्याथ्र्यांना शिऱ्याचा अल्पोहार देवून तोंड गोड केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य उमेश केने, प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य
निलिमाताई होले, आमला सरपंच रजनीताई मालखेडे, अशोक केने, सत्यसिंग जाधव, देवराव
ठोंबरे, प्राचार्य सुरेश देवळे, पर्यवेक्षिका भारती अवधुतकर उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू
महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्राचार्य देवळे यांनी
मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवराच्या हस्ते पाचवीच्या सर्व विद्याथ्र्यांना शालेय गणवेश,
नोटबुक व पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच वर्ग ६ते८च्या सर्व विद्याथ्र्यांना
पाठ्यपुस्तकाचे वितरण केले. कार्यक्रमाचे संचालन दीपक बडोणे यांनी केले.सर्व शिक्षकांनी
कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
Post a Comment