चांदूर रेल्वे /शहेजाद खान /---
चांदूर रेल्वे तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूकीत वैयक्तीक भागधारक मतदार संघातून आणि अनुसूचीत जाती जमाती संघातून दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामूळे तालुका खरेदी विक्री संघाची संपूर्ण निवडणूक अविरोध झाली. त्यामूळे पुन्हा आ.प्रा.वीरेंद्र जगताप गटाने चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघावर आपले विर्विवाद वर्चस्व सिध्द केले.
एकूण १५ जागांसाठी होणाऱ्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत १७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी (ता.२८) नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोघांनी नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामूळे संपूर्ण निवडणूक अविरोध झाली. वैयक्तीक भागधारक मतदार संघातून तिघांना निवडून द्यायचे होते. तर चौघांनी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी प्रभाकर भगोले यांनी आज उमदेवारी अर्ज मागे घेतल्याने गोविंदराव देशमुख, सुधीर नलगे, सतिश शेळके अविरोध निवडून आले. तसेच अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातून एकाला निवडून द्यायचे होते. या मतदार संघात तिघांनी अर्ज भरले.जात प्रमाणपत्र नसल्यामूळे दीपक मानवटकर यांच्या अर्ज अवैध ठरला. तर देवीदास राऊत यांनी उमेदवारी मागे घेतल्यामूळे अंबादास हुमने अविरोध निवडून आले. संलग्न सेवा मतदार संघातून आठ अर्ज दाखल झाले होते. अंबादास हुमने यांनी उमदेवारी अर्ज मागे घेतल्याने शेख अंबीर शेख मुनीर, प्रशांत भेंडे, रमेश गहुकार, सचिन जाधव, प्रविण चिंचे, पंकज शिंदे, भरत डोंगरे अविरोध निवडून आले. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्ग मतदार संघात हनुमंत मोडक यांचा एकमेव अर्ज आल्याने ते अविरोध निवडून आले. महिला मतदार संघाच्या दोन जागांसाठी कुसूम मनोहर वऱ्हाडे व छाया रमेश सुर्यवंशी या दोघींचे अर्ज आल्याने त्या अविरोध निवडून आल्या. इतर मागासवर्ग मतदार संघात राजेंद्र राजनेकर यांचा एकमेव अर्ज असल्याने ते अविरोध निवडून आले. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक बी.एस.पारीसे, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कावडकर यांनी काम पाहिले. एकेकाळी भरभराटीस असलेल्या व आता संस्थेकडे उत्पन्नाचे साधने नसल्यामूळे बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या खरेदी विक्री संघाला पुन्हा सुस्थितीत आणण्याचे शिवधनुष्य नवनिर्वाचीत संचालकाना उचलावे लागणार आहे.
Post a Comment