BREAKING NEWS

Wednesday, June 29, 2016

यवतमाळ पब्लीक स्कुल मधील शिक्षकांचे विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे , उद्या यवतमाळ बंदची हाक.

यवतमाळ- (शहेजाद खान)-/

यवतमाळ येथील दर्डा नगर मधील पब्लीक स्कुल मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचे सहा ते सात वर्षांच्या विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करण्याचा प्रकार आज उघडकीस आला असून आरोपी शिक्षकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
   यवतमाळ  शहरतील अत्यंत प्रतिष्ठीत व्यक्तीची पब्लीक स्कुल असून या शाळेत श्रीमंत, प्रतिष्ठांची मुले शिकतात.
शिक्षक हा गुरुची प्रतिमा मानल्या जात असून  त्याच्याकडे पाहण्याचा हा समाजाचा दृष्टीकोण आहे. परंतू येथील पब्लीक स्कुलमध्ये डॉन्स शिक्षक असलेल्या यश बोरुंदीया (४०) रा. राजेंद्र नगर , धामणगाव रोड व ड्राईंग शिक्षक अमोल क्षिरसागर (३५) रा. कावेरी पार्क, वडगाव यांनी त्याच शाळेतील ६ ते ७ वर्षांच्या विद्यार्थींनीशी काही  दिवसापासून घृणास्पद अश्लिल प्रकार केला असून याबाबत विद्यार्थींनी आपल्या आई-वडीलांकडे घडलेला प्रकार सांगीतला असता पालकांची याबाबत शाळेमध्ये सभा घेण्यात आली.
असा प्रकार झाल्याचे लक्षात येताच   इतर वृत्तपत्राचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष भाजपा, शिवसेना, मनसे पदाधिकारी यांनी तात्काळ झालेल्या या घृणास्पद प्रकाराविरोधात आवाज उठवून वडगाव पोलीस स्टेशन गाठले व आरोपी शिक्षकांविरोधात तक्रार दिली.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, मनोज इंगाले, अमोल ढोणे, बंटी जैस्वाल, रेखाताई कोठेकर, माया शेरे, शिवसेनेच्या पदाधिकारी लता चंदेल, मनसेचे देवा शिवरामवार, अनिल हमदापूरे, विकास पवार आदी कार्यकत्यांसह नागरिक उपस्थित होते. वडगाव रोड पोलीसांनी आरोपी शिक्षकांना अटक करुन त्यांच्यावर भादंवि ३५४, बाल लैंगिक अत्याचार यानुसार गुन्हे दाखल केले आहे. उद्या आरोपी शिक्षकांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव रोड पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय. गायकवाड मॅडम करीत आहे.

◆●◆●घटनेच्या निषेधार्थ उद्या सर्व राजकीय पक्षांचा यवतमाळ बंद ●◆●◆

यवतमाळ पब्लिक स्कुलमध्ये घडलेल्या घृणास्पद प्रकाराचा निषेध करण्याकरीता उद्या यवतमाळ बंदचे आवाहन सर्व राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना घडू नये याकरीता उद्या दिनांक ३० जून रोजी यवतमाळ बंदचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेचा निषेध शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.