●रंगया रेपाकवार /-- गडचिरोली /- ●
गडचिरोली शहरापासून अवघ्या तीन किमीवर असलेल्या माडेतुकुम गावातील एका घरात बिबट्या घुसल्याने खळबळ माजली, हि घटना मंगळवार रात्री 9 वाजता घडली बिबट्या गावात आल्याची माहिती कळताच गडचिरोली वन विभागाचे पथक आणि गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही आणला होता मात्र बिबट्याला पकडण्यात सर्व अपयशी झाले तब्बल तीन तासानंतर वनविभागाच्या पथकाला चकमा देऊन बिबट्या जंगलात पळाला,पुन्हा एकदा बिबट्या जंगलात पडल्याने माडेतुकुमचे ग्रामस्थ दहशतीत आहेत,गेल्या दोन महिन्यापासुन बिबट्याचे गावात ये-जा होते मात्र अनेकदा प्रयत्न करूनही आता पर्यंत वनविभागाला बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरला आहे त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत या पूर्वीही वनविभागाचे बिबट्याला पकडण्यासाठी अपयशी प्रयत्न केले आहे.वन विभागाने लवकर या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
Post a Comment