गडचिरोली / रंगया रेपाकवार /--
आपल्या सर्वांच्या जीवनात पाण्याचे अनन्य साधारण असे महत्व आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सर्वोत्तम गुणवत्ता असणे गरजेचे आहे. पिण्याचे शुध्द पाणी ग्रामस्थांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद गडचिरोली आणि पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, उपाध्यक्ष जिवन नाट, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी आर.जी.जवळेकर, विकास विभागाचे उपआयुक्त अनिल नवाळे, महिला व बालविकास विभागाच्या सभापती सुवर्णाताई खरवडे, सभापती अजय कुंकडलावार तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मधील संबंधीत अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, जनतेला शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करणे हे शासनाचे ध्येय आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत भरपूर आहे. परंतु काही पाणीसाठे फ्लोराईड मुळे किंवा अन्य रासायनीक प्रदुषनामुळे दुषित झाले आहे. तेव्हा योग्य तपासणी करुन पिण्यासाठी हे साठे बंद करावे व पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा जनतेला करावा. या करीता ग्रामपंचायत पासून ते जिल्हापरिषद मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी समन्वय साधून जबाबदारीने कामे करण्याच्या सूचना या प्रसंगी त्यांनी दिल्या.
स्वच्छता राखणे शुध्द पाण्याची उपलब्धता करणे या करीता जनजागृती करणे व लोकांचा सहभाग घेऊन प्रशासनाने प्रामाणिकपणे काम करावे. असेही निर्देश पालक मंत्र्यांनी यावेळी दिले
Post a Comment