कोल्हापूर, -
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एका निवेदनाद्वारे अपर पोलीस अधीक्षक नीलेश बारी यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या संदर्भात सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते काही काळ कोल्हापूर येथे रहात होते. मडगाव स्फोट प्रकरणातील संशयित आरोपी श्री. सारंग अकोलकर यांच्याही ते संपर्कात होते, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे. सदरचे निवेदन देणार्या शिष्टमंडळात युवा कार्यवाह कृष्णात कोरे, शहर कार्याध्यक्ष सुजाता म्हेत्रे, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, प्रकाश हिरेमठ, अरुण पाटील, गीता हसूरकर, निशांत शिंदे, धनाजीराव जाधव, उमेश सूर्यवंशी आदींचा समावेश होता.

Post a Comment