प्रमोद नैकेले /--
अचलपूर:- /---
आज स्वदेशी खेळ जे पूर्वी गावगावात खेळल्या जायचे ते जवळपास तरूणाईतून हद्दपार होतांना दिसत आहे त्यापैकी कुस्ती हा प्रकार सुध्दा असाच एक खेळ आहे या स्वदेशी खेळांची जागा विदेशी खेळांनी घेतली याची जाणीव ठेवून कुस्तींना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने अचलपूर मंडळ भाजयुमो तर्फे भव्य कुस्तीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय चालणा-या या स्पर्धेचे 25 जून रोजी स्थानिक कृषीउत्पन्न बाजारपेठेच्या प्रांगणात उद् घाटन अमरावती जिल्हा भाजपा महामंत्री गजानन कोल्हे यांचे हस्ते जिल्हा भाजयुमो अध्यक्ष रूपेश ढेपे, शहर भाजपा अध्यक्ष निलेश सातपूते, विदर्भ विभाग कुस्ती संघटना सरचिटनीस तथा पाच वेळा महाराष्ट्र केसरी भूषवलेले संजयजी तिरथकर भाजयुमो शहर अध्यक्ष अक्षय पाठक तसेच सोबत मा साहेबराव काठोले व भाजयुमो सरचिटणीस ललित ठाकुर व प्रतिक गावंडे ,भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते असे शहर भाजयुमो प्रसिध्दी प्रमुख प्रसेन नैकेले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
Achalpur News
Post a Comment