BREAKING NEWS

Tuesday, June 14, 2016

जागतिक पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर महागाव येथील तरुणांनी केली वृक्ष संवर्धन समितीची स्थापना - खड्डे खोदून एक हजार झाडे लावण्याचा वृक्ष संवर्धन समितीचा संकल्प

महागाव / रवी वाघमारे /-- 

 जागतिक पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर महागाव येथील तरुणांनी वृक्ष संवर्धन समितीची स्थापना करून संपूर्ण महागाव शहरातील आरोग्य केंद्र,हनुमान मंदिर,बौद्ध विहार ,मस्जिद,स्मशान भूमी,कब्रस्तान इत्यादी ठिकाणी खडे खोदून एक  हजार झाडे लावण्याचा वृक्ष संवर्धन समितीचा संकल्प आहे. मानवाने स्वताच्या फायद्यासाठी जंगल तोड केल्याने पर्यावरणाचे संतुलन दिवसेन दिवस बिगडत आहे.
वृक्षांची जास्त प्रमाणात तोड झाल्यामुळे हवा,पाणी,वायू या घटकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो हवेच्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम दिसून येत आहेत.
"हर एक पेड पौधा ऒर जीव जंतू 
इस धरती का संम्मान है
अगर करोंगे खिलवाड संतुलन से
तो भविष्य मे सिर्फ गहरा अंधकार है"    
अशातच महागवातील "वृक्ष प्रेमींनी" वृक्ष संवर्धन समितीने संपूर्ण महागाव शहर वृक्षमय करण्याचा संकल्प केला आहे या मध्ये राजकीय राजकारण न करता संपूर्ण महागाव शहर वृक्षमय कसे होईल या साठी सर्वच पक्षीय नेते एकत्र येउन वृक्ष संवर्धन समितीला मदत करतांना दिसत आहे वृक्ष संवर्धन समितीचे संपूर्ण महागाव तालुक्यात या त्यांचे वृक्ष प्रेमाबदल कौतुक केल्या जात आहे.वृक्ष संवर्धन समिती अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे,नगर पंचायत उपाध्यक्ष उदय भाऊ नरवाडे,नगर सेवक नारायण शिरबिडे,नगर सेवक विनोद कोपरकर,गटनेता राजू राठोड,नगर सेवक शैलेश कोपरकर,बालाजी पुरी,सुरेंद्र कावळे,डॉ.गिरिष नरवाडे,विठ्ठल वाघमारे,प्रमोद भरवाडे,परवेज सुरैया,नंदू कावळे,गजानन वाघमारे,संजय भगत,अमोल राजवाडे,गजानन साबळे,नानाभाऊ ठाकरे,बाबा पठाण,अविनाश नरवाडे,अमोल इंगोले,आदित्य पुरी हे सर्व जन "झाडे लावा झाडे जगवा" हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत.

 वृक्ष संवर्धन समिती अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे
ऊमरखेड येथे अनिलभाऊ वानखेडे व विजयरावजी खडसे यांनी सर्व ऊमरखेड वासी एकञ अनुन अंम्बोना तलावा साठी गाव एकञीत केले तेच विषय डोळ्या समोर ठेऊन महागांव  येथे वृक्ष संवर्धन समिती स्थापन  करूण महागांव येथे 1000 झाडे लावण्याचा संकल्प ठेवला आणी त्या संकल्पा मध्ये सर्व गाव सहभागी झाले या चांगल्या कार्याला गांवात कुठेच विरोध होत नसल्या मुळे  समिती ऊत्साह वाढला आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.