BREAKING NEWS

Tuesday, June 14, 2016

नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक खोळंबली; न्यायासाठी विनाअनुदानीत शिक्षक उतरले रस्त्यावर - शासनाने सरळ मार्गाने चालावे;आडरानात न शिरण्याचा शेखर भोयर यांचा इशारा


अमरावती / --

                    सुजलाम सुफलाम व निर्मल महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शिक्षणव्यवस्था बळकट असणे आवश्यक आहे.परंतु अच्छे दिनाची भाषा करणारे सरकार शिक्षकांचे न्याय हक्क हिरावुन घेऊन शिक्षणव्यवस्थेला पर्यायाने समाजव्यवस्थेला कमकवुत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अशा निर्दयी शासनाविरोधात विनाअनुदानीत शिक्षकांनी उपोषणाच्या सलग 14 व्या दिवशी नागपुर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केला.यावेळी आंदोलनकर्त्या विनाअनुदानीत शेकडो शिक्षकांना व कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली.
                  रहाटगाव टी पाॅइंट समोरील महामार्गावर हे आंदोलन उभारण्यात आले.यावेळी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर,संजयराव खोडके,नगरसेवक विजय नागपुरे ,महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत कृती समितीचे सुधाकर वाहुरवाघ,सुरेश शिरसाठ,गाजी जोहरोश  बाळकृष्ण गावंडे,पुंडलीकराव रहाटे,दिपक धोटे,गोपाल चव्हाण,विजय देशमुख,दिपक देशमुख,सुनिल देशमुख,रामेश्वर बोंद्रे,प्रशांत डवरे,आर.जी.पठाण,संतोष गुजर,गोपाल राठोड,विस्मय ठाकरे,निलेश पारडे,बबन तायडे,विष्णू सालपे तथा शिक्षक महासंघाचे मनोज कडू,अनिल पंजाबी,मोहन पांडे,मोहन ढोके,प्रा.नितीन टाले,प्रा.दिलीप उगले,संदिप भटकर,प्रदिप पुंड,जिवन सोनखासकर यासह अमरावती विभागातील शेकडो विनाअनुदानीत शिक्षक उपस्थित होते.
                  चाके ही प्रगतीचे प्रतिक असुन ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रावर आघात करणा-या व त्याची प्रगती कुंठीत करणा-या शासनाला शिक्षण देणा-या विनाअनुदानीत शाळांचे समाजव्यवस्थेतील महत्व समजावुन सांगण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन उभारण्यात आले.सामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास देणे हा या आंदोलनाचा हेतु नसल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर व महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत कृती समीतीचे सुधाकर वाहुरवाघ,सुरेश शिरसाठ यांनी स्पष्ट केले.
                      सलग 13 दिवस आंदोलनाचा वर्षाव करुनही निगरगट्ट व निद्रीस्त सरकारवर कोणताच परीणाम होत नसल्यामुळे चक्काजाम आंदोलनाने तरी मूक सरकारच्या बधीर संवेदना जाग्या होतील का? व याचा सरकारवर कोणता परीणाम होइल का? असे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले              130 आंदोलने करुनही सरकारला जाग येत नाही.महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेबद्दलचे हे शल्य मनाला बोचणारे आहे. 16 वर्षापासुन शिक्षकांच्या व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणा-या कुटूंबीयांच्या भावभावना मूकबधीर व गुंगी आलेल्या अवस्थेत असलेल्या शासनापर्यंत पोहोचतील का? असा सवालही यावेळी उपस्थित केल्या गेला.
                  शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रावर अशा आंदोलनामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत असुन सामान्य माणसाची शिक्षणक्षेत्राबद्दलची प्रतीमा डागाळली आहे याला सर्वस्वी शासनाचे धोरण आणि उदासिनता कारणीभुत आहे.शिक्षणक्षेत्राबद्दल काही करण्याची त्यांची मनस्थिती दिसत नाही.यामुळे शिक्षणपद्धती 1986 च्या मूळ राष्ट्रीय शैक्षणीक धोरणापासुन दुर चालली असुन शिक्षणक्षेत्र नामशेष करण्याच्या मार्गावर सरकारचे धोरण आहे.शासनाने शिक्षकांच्या 2 वेळच्या जेवणाच्या ताटात मिठ कालवले आहे.शिक्षकांची सर्व स्वप्ने धुळीस मिळवण्यास शासन कारणीभूत आहे.शिक्षण हा समाजाचा महत्वाचा आधारस्तंभ असुन शिक्षणव्यवस्थेवर आघात झाल्यास समाजव्यवस्था कोसळल्या शिवाय राहणार नाही याचे भान शासनाने ठेवावे अन्यथा जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण होइल व होणा-या परीणामास शासन जबाबदार असेल असे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.