पुणे, //---
भेटी लागी जीवा लागलीचिये आस या अभंगानुसार आषाढी एकादशीला लक्षावधी वैष्णवांच्या संगतीने पंढरपूर येथील सावळ्या परब्रह्माच्या भेटीला जाणार्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३३१ व्या पालखीचे २७ जून या दिवशी देहू येथून प्रस्थान झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून २८ जून या दिवशी प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी आणि पालख्यांसमवेत पंढरीनाथाच्या भेटीला जाण्यासाठी देहू आणि आळंदी या ठिकाणी लक्षावधी संख्येने वारकरी आले आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी देहूमध्ये पहाटे ५ वाजता महापूजा, त्यानंतर तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा, प्रस्थान सोहळ्यातील काल्याचे कीर्तन झाले. सकाळी ९ वाजता येथील इनामदार वाड्यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची महापूजा झाली आणि दुपारी २.३० वाजता प्रत्यक्ष प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. संत तुकाराम महाराजांच्या पालखीत यंदा ३३० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. पालखी सोहळा प्रस्थानाला अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री श्री गिरीश बापट, पाणीपुरवठा मंत्री श्री बबन लोणीकर, सामाजिक न्यायमंत्री श्री दिलीप कांबळे, खासदार श्री श्रीरंग बारणे, श्री अमर साबळे, माजी मंत्री श्री हर्षवर्धन पाटील, देहू संस्थानचे अध्यक्ष श्री शांताराम मोरे उपस्थित होते. या वेळी श्री मुनगंटीवार यांनी राज्यात पाऊस पडू दे, असे साकडे संत तुकाराम महाराज यांच्या चरणी घातले आहे. पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली आणि त्यानंतर पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी थांबली आहे.

Post a Comment