●◆प्रतिनिधि- समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा ●◆
शेगांव -- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या शेगांव तालुकाध्यक्षपदी नीर्भया फाउंडेशनच्या अध्यक्षा व भाजपच्या नेत्या सौ.कल्पनाताई मसने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे महाराष्ट्र प्रभारी श्री. राजसिंह सोळंकी व बुलढजील्हा प्रभारी श्री. गजानन वर्मा यांनी शेगांव तालुकाध्यक्षपदी नियुक्तीचे पञ सौ.कल्पनाताई मसने यांना आज बुलढाणा कार्यालयात दीले. महिलांच्या समस्या सोडवीण्यासाठी सौ.मसने नेहमीच अग्रेसर असतात. शेगांव पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या त्या सदस्या आहेत व समीतीत त्यांचेकार्य उल्लेखनीय आहे तसेच त्या नीर्भया फाउंडेशनच्या अध्यक्षा असून त्यामाध्यमातुन सामाजिक कार्य सतत करीत आहेत. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या शेगांव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महिलांना घटनात्मक न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. ज्या पीडित महिलांना योग्य न्याय मीळत नसेल त्यांना मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले व आपल्या नियुक्तीचे श्रेय त्यांनी श्री सोळंकी व श्री वर्मा यांना दिले.
Post a Comment