रंगया रेपाकवार /-
गडचिरोली/-
गडचिरोली/-
गडचिरोली जिल्हयात सुरु असणाऱ्या विकास कामांचे तसेच सकारात्मक बदलाचे प्रतिबिंब शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य तसेच महाराष्ट्र अहेड मध्ये प्रतिमाह दिसावे या दृष्टीकोणातून नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी दिल्या.
यंदा चांगला पाऊस होईल या अंदाजानंतर जून 2016 च्या लोकराज्यच्या अंकात पावसाचे शुभवर्तमान या कव्हरस्टोरीसह विशेषांक काढण्यात आला आहे. या अंकाची प्रत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी आज जिल्हाधिकारी नायक यांना भेट दिली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सततच्या दुष्काळानंतर यंदा पावसाचे चांगले भाकीत आहे. या पार्श्वभूमीवर पाऊस तसेच खरिप हंगामात खते-बियाणे यांची उपलब्धता, पीक कर्जाचे पुनर्गठण, टँकरची उपलब्धता, जलयुक्त शिवार योजना याचा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आढावा मुख्यमंत्र्याच्या जनसंपर्क अधिकारी किर्ती पांडे यांनी शब्दांकीत केला आहे.
पावसाळी पूर्व आढावा तसेच आपत्ती व्यवस्थापन याबाबतही माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 300 वर्षापूर्वी करण्यात आलेल्या जलव्यवस्थापनावर इतिहासाचे अभ्यासक डॉ. मधुकर जाधव यांचा खास लेख या अंकात आहे.
लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मराठी टक्का यंदा वाढलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत महत्वाचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत. यावरही वि
अतिथी संपादक असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांच्यासह महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या मार्गदर्शनात प्रबंध संपादक तथा संचालक देवेंद्र भूजबळ , संचालक शिवाजी मानकर तसेच संपादक सुरेश वांदिले आणि कार्यकारी संपादक प्रविण टाके आणि सर्व संचालक, उपसंचालक आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी लोकराज्यसाठी विशेष प्रयत्न केले आहे. त्यामुळे सर्वाधिक खपात लोकराज्य सतत महाराष्ट्रात सर्वप्रथम आणि देशात तिसरे स्थान राखण्यात यशस्वी ठरले आहे.
जुलै ते डिसेंबर 2015 या कालावधीत लोकराज्यचा खप 3 लाख 88 हजार 176 इतका असल्याचे प्रमाणपत्र ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशनने नुकतेच दिले आहे.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयात लोकराज्यची जबाबदारी सांभाळणारे प्रवीण ठाकरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे चापले यांचीही उपस्थिती होती. लोकराज्य मासिक खरेदी करण्यासाठी गडचिरोली बसस्थानक किंवा जिल्हा माहिती कार्यालय, कॉम्पलेक्स गडचिरोली येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment