BREAKING NEWS

Tuesday, June 14, 2016

सि टी पी एस विरोधात रायुकाचं आक्रोश आंदोलन - स्थानिक सुशिक्षीत बेरोजगार, महिला बचत गट व कामगारांना प्राधान्य देण्याची मागणी - आंदोलनात कार्यकत्र्यांचा लक्षणीय सहभाग

प्रवीण गोंगले / चंद्रपूर /--       




सि टी पी एस व्यवस्थानाकडुन सुशिक्षीत बेरोजगार, महिला बचतगट व कामगारांवर होणा-या अन्यायाच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा युवक काॅंग्रेसच्या वतीनं 14 जुनला मेजर गेट जवळील सि टी पी एस च्या प्रवेशद्वारासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं. रायुकाॅचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यानी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी अकबर खान, फैय्याज शेख, सैय्यद अन्वर, सुजीत उपरे, अभिजीत खन्नाडे, संजु ठाकुर, पवन मेश्राम, राहुल भगत, नितीन रत्नपारखी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

5 लाख रुपये मर्यादा असलेले व ई इन्कवायरी अंतर्गत निघणारे कंत्राट स्थानिक व प्रकल्ग्रस्त सुशिक्षीत बेरोजगार तसंच महिला बचत गटांना देण्यात यावं, सि एस आर अंतर्गत निघणारे कंत्राट अधिका-यांशी संगनमत असलेल्या गब्बर कंत्राटदारांना देण्याची प्रथा बंद करावी, हे कंत्राट स्थानिक सुध्दा सुशिक्षीत बेरोजगार व महिला बचत गटाना देण्यात यावे, 1 हजार मेगावॅट नविन प्रकल्पाअंतर्गत निघणा-या कंत्राटी रोजगारात कुशल, अर्ध कुशल व अकुशल या सर्व वर्गवारीतील बेरोजगारांना शासन कायद्यानुसार नोकरी द्यावी, कंत्राटदारांकडे नोकरी करणा-या प्रत्येक कामगाराला शासनाच्या कामगारासंबंधी असलेल्या मिनिमम वेजेस, पि एफ, घरभाडे, वार्षीक बोनस, मेडिकल बेनिफीट, मस्टर कार्ड, पेमेंट स्लिप, बॅंकेद्वारे वेतन या कायद्याची अंमलबजावणी करावी, कामगारांसंबंधी असलेल्या शासन नियमांचे पालन न करणा-या कंत्राटदारांवर कायदेशिर कारवाई करावी, 500 मेगावॅटच्या 2 संच निर्मितीत विलंब झाल्यामुळं प्रकल्पाची वाढलेली किंमत बी जी आर व बि एच ई एल या कंत्राटी कंपन्यांकडुन वसुल करावी आणि अर्थपुर्ण संबंधातुन कंत्राटदारांच्या सोयीनुसार आजपर्यंत काढण्यात आलेल्या कंत्राटांची उच्च स्तरीय चैकशी करावी, या मागण्यांना घेउन रायुकानं आक्रोश आंदोलन केलं होतं.

या आंदोलनामुळं सि टी पी एस च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामगारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तासभर या कामगारांना गेटवरच ताटकळत राहावं लागलं. त्यामुळं सि टी पी एस व्यवस्थापकानी आंदोलनस्थळी पोहचुन रायुकाच्या मागण्यांचं निवेदन स्विकारले. तसंच या मागण्यासंदर्भात 17 जुनला बैठक घेण्याचं आश्वासन दिल्या गेल्यानं रायुकानं आपलं आंदोलन तुर्तास मागं घेतले. पण यावेळी नितीन भटाकर यानी दिलेल्या आश्वासनानुसार बैठक न घेतल्यास तसंच बैठकीत मागण्यांवर उचित निर्णय न झाल्यास यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.