चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---

तालुक्यातील घुईखेड येथील एका ९ वर्षीय बालकाचा बेंबळा धरण प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रवीवारी घडली. हर्षद वसंतराव ठोंबरे असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूला बेंबळा धरण पुनर्वसन अधिकाNयांच्या निष्काळीपणामूळे नाहक एका बालकाला आपले प्राण गमवावं लागलं.
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड गाव बेंबळा धरण प्रकल्पामध्ये गेले. पाच वर्षापूर्वी गावचे पुनर्वसन नागपुर-पुणे एक्सप्रेस हायवे चौपुुâलीवर झाले. जुने घुईखेड गाव बुडीत क्षेत्रात गेले. गावातील अनेक विहिरी बुडीत क्षेत्रात गेल्या. वसंतराव ठोंबरे यांचा मुलगा हर्षद खेळत असतांना बुडीत क्षेत्रातील एका छोट्या विहिरीत पडून गाळात फसून मृत्यू झाला. बुडीत क्षेत्रात गेलेल्या विहिरी बुजविणे पुनर्वसन अधिकाऱ्यांचे काम होते. मात्र त्यांच्या निष्काळजीपणामूळे बुडीत क्षेत्रातील विहीरी तश्याच ठेवल्यामूळे हर्षद ठोंबरे यांला आपले प्राण गमवावं लागले. हर्षद हा वर्ग ४ मध्ये गेला होता. येत्या १९ जुनला त्याचा नववा वाढदिवस होता. मात्र त्या पुर्वी खुल्या विहिरीने त्याचा जीव घेतला. दोन वर्षापूर्वी त्यांच्या आईचा मृत्यु झाला.वडिल मोलमजुरी करतात. त्याच्या पश्चात वडिल व लहान सात वर्षीय बहिन आहे. या बालकाच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment