
हिंदुत्ववाद्यांना सहयोग करण्याऐवजी पुरोगाम्यांना खुश करण्यासाठी शासन दाभोलकर कुटुंबियांच्या तालावर नाचत आहे. काँग्रेसच्या काळात सनातनवर अत्याचार झाला; पण भाजपच्या काळातही पुरोगाम्यांना खुश करण्यासाठी सनातनचा बळी देण्यासाठी सिद्धता हे लोक करतील, अशी कल्पनाही आम्ही कदापि केली नव्हती. सनातन संस्था ही ईश्वराच्या आशीर्वादाने स्थापन झालेली असून ती अशा लोकांच्या त्रासामुळे नष्ट होणार नाही. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करून पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्य करणार्या सनातन संस्थेला लक्ष्य करून तिचा नाहक बळी देण्याचा लांच्छनास्पद प्रयत्न चालू आहे. यातून येनकेन प्रकारेण सीबीआयने सनातन संस्थेला गोवण्यासाठीच एक षड्यंत्र रचले आहे. पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक करून ८ मास (महिने) झाले, तरी अजून एकही पुरावा तपास यंत्रणांकडे नाही. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई चालू आहे. उद्या कलबुर्गी हत्येप्रकरणीही सनातनच्या आणखी काही निर्दोष साधकांना गोवून अटक करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल, यात शंका नाही. आज सनातनच्या साधकांना पकडण्यासाठी मोठा दबाव आहे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार पोलीस वागत आहेत. या तथाकथित पुरोगामी संघटनांना खूश करण्यासाठीच सनातनला त्रास दिला जात आहे. आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी सनातन संस्थेवर सनातन हा हिंदु धर्मावर लागलेला कलंक आहे, अशी टीका केली. खेतान यांच्या आप पक्षाने जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा देणार्यांचे उघड समर्थन केले आहे. त्यामुळे आप हाच खर्या अर्थाने या देशाला लागलेला कलंक आहे. सनातन संस्थेसारख्या हिंदु धर्मासाठी अहोरात्र झटणार्या संस्थेला अशा कलंकित पक्षाचे नेते असलेल्या आशिष खेतान यांच्या प्रमाणपत्राची काडीचीही आवश्यकता नाही.
एक दिवस आम्हीच समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना घेऊन त्यांना दिलेल्या अनन्वित छळाची माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई आणि पुणे येथे निर्दोषत्व सभा घेऊ, असेही श्री. अभय वर्तक यांनी सांगितले.
Post a Comment