
तथाकथित पुरो (अधो) गामी संघटना हे सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये कोंबिंग ऑपरेशन करण्याची भाषा वापरतात. सनातनचे साधक हे निर्दोष आहेत. पुरोगामी संघटनांनी हे लक्षात ठेवावे की, देशातील २५० हून अधिक हिंदुत्ववादी सनातन संस्थेच्या पाठीशी आहेत. हिंदु धर्म संपवायचा, हिंदु धर्मप्रसारकांना त्रास द्यायचा आणि त्यांची अपकीर्ती करायची, हेच एकमेव पुरोगाम्यांचे ध्येय आहे. देशात पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्रात सनातन संस्था यांची अपकीर्ती केली की, प्रसिद्धी मिळते, अशी परिस्थिती आहे.
काँग्रेसवाल्यांनी क्रांतिकारक भगतसिंह यांना आतंकवादी ठरवले आहे. फाळणीच्या वेळी १० लक्ष हिंदूंची हत्या झाली त्याला आणि शिखांच्या हत्याकांडाला काँग्रेसवाले उत्तरदायी आहेत. आम आदमी पक्षाने गोव्यात पुढील वर्षी होणार्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे गोव्यात प्रभाव असणार्या हिंदुत्ववादी संस्थेवर आरोप करून फुकट प्रसिद्धीसह अल्पसंख्यांक मतांची बेगमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
Post a Comment