रास्त भाव धान्य दुकान व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारकांच्या विविध मागण्या व समस्यांकडे युती सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशनच्या वतीने 1 ऑगस्टपासून मुंबईसह महाराष्ट्रातील रास्तभाव दुकानदार अन्नधान्य व केरोसीनचा कोटा उचलणार नाहीत व वितरण करणार नाहीत अशी माहिती माजी खासदार व संस्थेचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी महाराष्ट्र राज्य रास्त भाव धान्य दुकानदार असोशिएशन (ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशन)चे सरचिटणीस बाबुराव म्हमाणे (सोलापूर), कार्याध्यक्ष वसंतराव अग्रवाल (मिरज), संजय पाटील (नागपूर), अप्पासाहेब तोडकरी (सातारा), बाबूभाई शहा (ठाणे), उपाध्यक्ष जमनादास भाटिया (जळगाव), अशोक एडके (नांदेड), गणपत डोळसे पाटील (नाशिक), खजिनदार विजय गुप्ता (पुणे) आदी उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात 55 हजार रास्तभाव धान्य दुकान व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारक असून या सर्वांची शहर, तालुका व जिल्हा संघटनेची नेतृत्व करणारी रितसर नोंदणीकृत एकमेव ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशन ही संस्था राज्यातील दैनंदिन अन्न, धान्य, केरोसीन वितरणाविषयी तसेच परवानाबाबत येणारे अनेक अडचणीचे निवारण करण्याचे काम करत आहे.
Post a Comment