BREAKING NEWS

Monday, July 11, 2016

गडचिरोलीतील पूरपरिस्थिती कायम - 200 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला , जनजीवन विस्कळीत, विजही गायब

 गडचिरोली -- 
 

मागील 3 ते 4  दिवसांपासून सुरु असलेला पाऊस अजून तरी थांबायचे नाव घेत नसून, विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने  वर्तविला आहे. यातच गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात पूरपरिस्थिती कायम असून, मुलचेरा तालुक्यात पुराने थैमान घातले आहे.जवळपास 200 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला असून  जनजीवन विस्कळीत झाले आहे व अनेक भागातील वीजही बेपत्ता झाली आहे
गेल्या चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक २३९.८ मिलिमीटर पाऊस पडला. गडअहेरी पुलावरही पाणी असल्याने हा मार्ग बंद आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी चढले. पुलावरुन दोन फूट पाणी वाहत असल्याने आष्टी-गोंडपिपरी मार्ग बंद झाला होता. परंतु दुपारी २ वाजता हा मार्ग सुरु झाला. तसेच बंद झालेला आलापल्ली-मुलचेरा मार्ग दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास सुरु झाला.  तरीही अतिवृष्टी झाल्यास पुन्हा हा मार्ग बंद होऊ शकतो. सध्या सिरोंचा असरअली, आलापल्ली-आष्टी, कसनसूर-एटापल्ली, चामोर्शी-घोट-मुलचेरा, आलापल्ली-भामरागड,गडचिरोली-साखेरा-पेंढरी-बोटेहूर, कारवाफा-पोटेगाव-घोट-मार्कंडा व एटापल्ली-गट्टा हे मार्ग अजूनही बंदच असल्याने कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही गैरसोय होत आहे. काही क्षण विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा हजेरी लावत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, बाजारपेठाही थंडावल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील पावसामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहें गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्यात येत आहें . मध्य प्रदेशात पाऊस सतत पडत आहें यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची आवक वाढत आहें धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री दुर्वेश सोनावणे यांनी केले आहें आपत्ती संदर्भात आपण ०७१३२ २२२०३१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.