पुणे :
मागील काही महिन्यांपासून पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहे या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकार हल्ल्यांविरोधात कठोर कारवाई व पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी निवेदन दिले होते याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण लवकरच पत्रकार संरक्षण कायदा करणार आहोत असे आश्वासन याप्रंगी दिले .
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ल्यांच्या घटना घडलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने दैनिक पुढारीचे पत्रकार नाथाभाऊ उंद्रे हे अवैध धंद्याच्या विरोधात बातमी करत असताना गावगुंडांनी त्यांना शिवीगाळ व जीवेमारण्याची धमकी दिली .दैनिक सकाळचे उस्मानाबादचे प्रतिनिधी बाबासाहेब गायकवाड यांनी अवैध धंद्याबाबत बातमी छापल्याचा राग धरून हल्ला करण्यात आला. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार अब्बास शेख यांनी वीजचोरीच्या विरोधात बातमी छापली असता त्यांच्या व त्यांची आई यांच्यावर हल्ले करुण जखमी करण्यात आले आहे. सांगली येथील जत मध्ये दैनिक सकाळचे पत्रकार यांच्यावर सुधा अवैध धंद्याबाबत बातमी छापली म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला . आहेत. नागपूर येथील हिंगणा येथे अहिल्याबाई होळकर आश्रम शाळेमधील गैरव्यवहाराची माहिती घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिडीया आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर सुरभी शिरपूरकर, कँमेरामन प्रशांत मोहिते, महाराष्ट्र वनचे ब्युरो चीफ गजानन उमाटे,कँमेरामन सौरभ होले आणि सुनील लोंढे गेले असता संस्था चालकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. यवतमाळ येथील टीव्ही 9 चे प्रतिनिधी विवेक गांवडे व दैनिक सकाळ चे प्रतिनिधी मनोज जैसवाल यांच्यावर सुधा हल्ला करण्यात आला आहे.अशाप्रकारे गेल्या सहा महिन्यात राज्यामध्ये पन्नास पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत.
पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या ह्ल्यांच्या विरोधात कठोर कारवाई व पत्रकार संरक्षण कायदा कठोर व सक्षम करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार संरक्षण समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल चौधरी व जिल्हा उपाध्यक्ष गोविंद कामत यांना दिले.
फोटो ओळ : पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या ह्ल्यांच्या
विरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देताना अनिल चौधरी व गोविंद कामत .

Post a Comment