BREAKING NEWS

Monday, July 25, 2016

उडी मारल्याने वाचले चौघाचे प्राण - पुल ओलांडणे पडले महाग, मिनीट्रक पुरात अडकला चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील घटना


चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---




         पुलावरून वाहता पाण्याचा अंदाज आल्यामुळे एका मिनीट्रक चालकासह अन्य तिघांच्या जिवावर चांगलाच बेतला. प्रसंगावधान साधुन चालकासह तिघांनी उडी घेऊन जीव वाचविला. तर मिनीट्रक पुराच्या पाण्यात पुलाला अडकला. सदर घटना शनिवारच्या सायंकाळी साडे पाच वाजता चांदूर रेल्वे नजीक पळसखेड रस्त्यावरील पुलावर घडली.
चांदूर रेल्वे तालुक्यात शनिवारी साडे तीन वाजता मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे चांदूर रेल्वे शहराला वळसा मारून जाणाऱ्या  नाल्याला जोरदार पुर आला. या नाल्यावरून पाणी वाहत असतांना मिनीट्रक चालक श्री सुधिर ज्ञानेश्वर डोंगरे याने मिनीट्रक पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला नाल्यावरून वळसा मारून जाणाऱ्या  रपट्याचा अंदाज न आल्याने काही अंतरापर्यंत हा मिनीट्रक गेला.मात्र नाल्याच्या मधोमध गेल्यानंतर मिनीट्रक वाहून जात असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालक श्री सुधीर डोंगरे, श्री आशिष सहारे, श्री सुरेश सहारे, श्री गजानन घोडमारे सर्व रा.आमला विश्वेश्वर यांनी वाहनाबाहेर उड्या घेऊन प्राण वाचविले. हा मिनीट्रक श्री गजानन घोडमारे यांच्या मालकीचा असुन श्री सुरेश भागवत सहारे यांचे घरगुती साहित्य नेर येथे पोहोचवून दिल्यानंतर ते आमला विश्वेश्वरला परत येत होते. मात्र नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने हा मिनी ट्रक पुराच्या पाण्यात आडवा झाला. ठाणेदार श्री गिरीष बोबडे, नायब तहसीलदार श्री दिनेश बढीये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.