BREAKING NEWS

Monday, July 18, 2016

नागपूरमध्ये पाच पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध - पञकार संरक्षण समिती

यवतमाळ ,


राज्यात  पत्रकारांवर होत असलेले हल्ले थांबवणे  शक्य नसुन महाराष्ट्र शासन सुध्दा पञकारांना व पञकार संरक्षण कायदा काढण्यासाठी दिवसेंदिवस अपयशी ठरत आहे.
  महाराष्ट्राची उप - राजधानी असलेल्या  नागपूरमध्ये पाच पत्रकार आणि कॅमेरामनला एका शिक्षण संस्थेत मारहाण केली .
तसेच पत्रकारांच्या गाड्या  जाळण्याचाही प्रयत्न झाला.
अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळा असे या शिक्षण संस्थेचे नाव आहे.
या संस्थेत अनेक घोटाळे सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. खोटी पट संख्या दाखवून अनुदान लाटले जात असल्याचेही सांगितले जात आहे .
या सर्व आरोपांची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र वन चॅनलचे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे आणि कॅमेरामन सौरभ होले तसेच आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर सुरभी शिरपूरकर,कॅमेरामन प्रशांत मोहिते आणि सुनील लोढेे संस्थेत गेले असता तेथे संस्थाचालक श्रीकृष्ण मते आणि त्यांच्या मुलांसह काही कर्मचार्‍यांनी पत्रकारांवर हल्ला चढवून त्यांना मारहाण केली.
महिला पञकारांना सुद्धा मारेकरांनी  मारहाणीतून सुटल्या नाहीत.
या घटनेमुळे माध्यमामध्ये संतापाची लाट उसळली आहे .
पञकार संरक्षण समितीचे समिती व  महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपञ पञकार असोसिएशन  अध्यक्ष विनोद एन. पञे  यांनी नागपुर येथे झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून संबंधित संस्था चालकांवर कडक कारवाई करावी अश्या  मागणीचे पञ मा. श्री  मुख्यमंत्री साहेबांना  पाठवून करणार  आहे.
महाराष्ट्र  सरकार व केंद्र सरकार  पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनेत  दिवसेंदिवस वाढचहोऊ लागली आहे .
पञकार संरक्षण कायदा या  मागणीसाठी पञकार संरक्षण समितीला रसत्यावर उतरून  आंदोलन करण्याचा इशारा सरकारला लवकरच देऊ .
  महाराष्ट्रातील  पत्रकारांचा आता जास्त अंत न बघता तातडीने याच पावसाळी अधिवेशनात कायदा करून समस्त पञकारांना न्याय द्यावा , नाहीत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही  अशी मागणी पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष  विनोद पञे , विजय सुयॅवंशी , अनिल चौधरी , नंदकिशोर धोञे , प्रविण रापतीॅवार ,  अनिलकुमार पालीवालसह इत्यादि पञकारांनी यांनी केली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.