रंगया रेपाकवार /--
गडचिरोली ---/-- - गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात कत्तल करण्यासाठी आज घेऊन जात असलेल्या दोन ट्रक सह ६५ बैल घोट पोलीसांनी जप्त केले आणी आजच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन ट्रक व ५५ बैल अहेरी पोलीसांनी जप्त केले आहे.दोन घटनेत १२० बैल,चार ट्रक आणी सात आरोपींना अटक केले यातील एक आरोपी फरार झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातून दोन ट्रक मध्ये ५५ बैल घेऊन अहेरी -- सिरोंचा मार्ग तेलंगणा राज्यात कत्तल करण्यासाठी जात असल्याची माहिती बजरंगदलच्या कार्यकर्त्यांना मिळाली.माहितीच्या आधारे बजरंगदलाचे कार्यकर्ते नागेपल्ली गावाजवळ सापडा रचून बसले होते. आज पहाटे चार वाजताच्या दरम्यान आलापल्ली कडे जाणाऱ्या दोन ट्रकला अडवून पाहणी केली असता ट्रक मध्ये ५५ बैल आढळून आले.याची माहिती तात्काळ अहेरी पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळावर जाऊन TC--05 B 4834 आणी TC 05 UB 7579 क्रमांकाचे ट्रक ५५ बैल जप्त केले आणी नरसिम्हा रमावंत , देवराज तरपूरी , गोपी मुलगुरी आणी मधु असे चार आरोपींना अटक केली.मोहम्मद नावाचा आरोपी फरार झाला आहे.जप्त करण्यात आलेल्या ५५ बैलांना आलापल्लीच्या कोंडवाड़्यात ठेवण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत आज पहाटे चामोर्शी वरून घोट मार्गाने काही बैल कत्तल करण्यासाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती घोट पोलीसांना मिळाली.माहितीच्या आधारे घोट पोलीसांनी चामोर्शी घोट मार्गावर आज पहाटे ५ वाजताच्या दरम्यान गस्त घालत असतांना दोन ट्रक घोट कडे येताना पोलीसांना दिसले ट्रक थांबवून झडती घेतली असता ट्रक मध्ये ६५ बैल कोंडून नेत असल्याचे पोलीसांना दिसले पोलिसांनी TSO -- 54 A 9739 आणी Ap - 29 T.V. 7155 क्रमांकाचे ट्रक जप्त केले आहे
Saturday, July 16, 2016
तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चार ट्रकसह १२० बैल जप्त - सात आरोपींना अटक,एक आरोपी फरार अहेरी आणी घोट पोलिसांची कारवाई
Posted by vidarbha on 10:18:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment