BREAKING NEWS

Friday, July 22, 2016

हर्ष अग्रवालची मलेशियाकरीता निवड. अंबुजा सिमेंटव्दारा पर्यावरणाच्या संगोष्टी हेतु निवड.

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-

 

पर्यावरणाच्या संगोष्टीहेतु अंबुजा सिमेंटतर्फे स्थानिक हर्ष सुनिल अग्रवाल याची मलेशिया करीता निवड झाली असुन तो मलेशियाकरीता ३० जुलैला रवाना होणार आहे.
               अंबुजा सिमेंट कंपनीतर्फे डिलर हेतु नुकताच डिलर कलाकार कार्यक्रम अकोला येथील  सिटी स्पोर्ट क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाना, यवतमाळ येथील सर्व डिलर सहभागी झाले होते. यामध्ये चांदुर रेल्वे शहरातील अंबुजा सिमेंट डिलर सुनिल अग्रवाल यांच्यासह त्यांचा १४ वर्षीय मुलगा हर्ष अग्रवालही सहभागी झाला होता. यावेळी हर्ष ने उपस्थितांसमोर विचार व्यक्त करतांना सांगितले की, पर्यावरणाची निगा राखणे हे सध्याच्या काळात अतिशय महत्वाचे आहे . कारण पर्यावरणाचा तोल जर ढासळला तर मानवी जीवन धोक्यात येईल , यासाठी आपल्या सभोवतालच्या परिसरात वृक्षारोपण केले पाहिजे . ' झाडे लावा झाडे जगवा ' असे झाडे लावण्यास प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी अनेक कार्यक्रम केले पाहिजे . लोकांना झाडे लावण्याचे फायदे आणि त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे . ' एक घर , एक झाड 'हि संकल्पना स्पष्ट होते कि प्रत्येक घरोघरी एक झाड तरी लावले पाहिजे यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकवण्यास मदत होते.' झाडे ,  झुडप ,  हवा , पाणी हिच खरी संजीवनी ' हे घोष वाक्य लक्षात घेऊन आपण पर्यावरणाची निगा राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच दुष्काळ म्हणजे पाण्याची व त्या योगे अन्नस्रोतांची अनुपलब्धता किंवा तीव्र टंचाई असलेला, अनेक महिन्यांचा वा वर्षांचा दीर्घ कालखंड होय. दुष्काळ येण्यास वातावरणातील आकस्मिक बदल, वृक्षतोड किंवा ज्वालामुखींचे उद्रेक किंवा वणवे इत्यादी कारकांनी उद्भवलेले पर्यावरणीय जलचक्रातीलदोष कारण असू शकतात. दुष्काळात अन्नपाण्याच्या अभावी माणसांसह बहुसंख्य सजीवांना प्राण संकटासतोंड द्यावे लागते. जेथे दुष्काळ पडतो, त्या ठिकाणची उत्पादकता, वसणूक पुन्हा सावरणे खूप कठिण असते.व दुष्काळापासुन कसे मुक्त होणार याबाबही त्याने मनोगत व्यक्त केले. त्याने विचार व्यक्त केलेल्या बाबी सर्वांना पटल्या. त्यामुळे त्याची मलेशियाकरीता निवड करण्यात आली असुन पर्यावरणाबद्दल तेथेही तो आपले विचार मांडणार असुन त्यासाठी तो शहरातुन ३० जुलैला रवाना होणार आहे. हर्ष हा ९ व्या वर्गात अमरावती येथील पोद्दार इंटरनैशनल स्कुलमध्ये शिक्षण घेत आहे.
               हर्षच्या मलेशिया येथील निवडीबद्दल त्याच्यावर सर्वच स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.