नवी मुंबई -- -
सानपाडा सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक १७ ए येथे हिंदुबहुल वस्तीमध्ये सिडको प्रशासनाने गेल्या १८ वर्षांपासून मशिदीसाठी दिलेल्या भूखंडाचे आरक्षण हटवावे. सिडको प्रशासनाकडून मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात येत आहे. सिडकोने हिंदूंच्या भावनांचा अंत पाहिल्यास त्याचा उद्रेक होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी येथील हिंदु नागरिकांनी संघटित मोर्च्याद्वारे २१ जुलै या दिवशी दिली.
मागील १८ वर्षे सानपाडावासीय सातत्याने सिडको प्रशासनाकडे वरील मागणी करत आहेत; मात्र सिडको प्रशासनाने याविषयी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. सिडको प्रशासनाचा भूखंड आरक्षणाचा चुकीचा निर्णय हिंदूंसाठी डोकेदुखी ठरला आहे. याविषयी सिडकोने न्यायालयात योग्य भूमिका मांडून मशिदीचे आरक्षण रहित करावे, अशी हिंदूंची मागणी आहे; मात्र अनेक वर्षे होऊनही सिडकोने याविषयी ठोस भूमिका मांडलेली नाही. केवळ प्रशासनामुळे हा विषय संवेदनशील झाला आहे, असा आरोप सानपाडावासियांकडून करण्यात येत आहे. सिडको प्रशासनाच्या या गलथान कारभाराच्या विरोधात सानपाडा-तुर्भे येथे संतप्त शेकडो नागरिकांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम (चाक बंद) आंदोलन केले. आंदोलनानंतर बेलापूर येथील सिडकोभवनावर मोर्चा नेण्यात आला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मोर्च्याच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
><><>< 🔹 काय आहे प्रकरण ?🔹 ><><
१. वर्ष १९९८ मध्ये सानपाड्याच्या हिंदुबहुल भागात मशिदीसाठी भूखंड आरक्षित करण्यात आला. येथे मुसलमान लोकसंख्या अत्यल्प आहे आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी अनेक प्रार्थनास्थळे आहेत. याकरिता पोलिसांकडून मिळालेला ना हरकत दाखलाही संदिग्ध आहे. आता महानगरपालिकाही बांधकामाला संमती देण्याच्या सिद्धतेत असल्याचे समजते

Post a Comment