चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---
मुलीचे लग्न व वैद्यकिय उपचारासाठी घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेडीनंतरही अपंग विधवेची शेती अवैध सावकाराने इसार चिठ्ठीच्या बहाण्याने सही घेऊन १.३६ हेक्टर शेती हडपल्याची घटना चांंदूर रेल्वे तालुक्यात अमदोरी गावी घडली. शेती हडपल्याची माहिती विधवेला अवैध सावकाराच्या घरी टाकलेल्या धाडीत मिळालेल्या कागदपत्रातून मिळाली हे विशेष.
अमदोरीचे पुंडलिक परसराम राऊत यांना शासनाकडून १९७७ मध्ये सिलींगची गट क्र.३८९ भोगवटदार-२ ची २.७३ हेक्टर शेती मिळाली. पुंडलिकराव याच शेतीतून घरसंसार चालवित होते. ४/१२/१९८६ ला त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कमलाबाई राऊत, मुलगा संतोष, मुलगी रंजना, अर्चना वारसदार झाले. सन २००४ मध्ये कमलाबार्इंला वॅâन्सरमूळे उजवा पाय गमवावा लागला. कर्जबाजारी कमलाबार्इंला औषधोपचार, मुलींचे लग्न व बँक कर्ज फेडण्यासाठी पैशाची नितांत गरज होती. मुलगा संतोषने आईच्या इलाजासाठी रामेश्वर बोबडे कडून १.३६ हेक्टर शेती इसार चिठ्ठी लिहून ५ हजार उसनवार घेतले. रामेश्वर बोबडे यांनी चांदूरचे श्रीकृष्ण खेरडे व विनायक कुबडे खाजगी सावकार असुन पैसे देत असल्याचे सांगीतले. बँक व सोसायटीचे कर्ज असल्याने कोणी कर्ज देण्यास तयार नव्हते. अपंग व आजारपणामूळे कुठे फिरू शकत नसल्यामूळे बोबडेनी श्रीकृष्ण खेरडे यांना कमलाबाईच्या घरी आनले. कमलाबार्इंनी उपचार व मुलींच्या लग्नासाठी ३० हजार रूपये कर्जाऊ मागीतले. कमलाबाईची भोगवटदार वर्ग २ ची शेती असल्यामूळे खरेदी खत होऊ शकत नाही. आणि शेतीचे खरेदी खत लिहिल्या शिवाय कोणाला रक्कम देत नसल्याचे खेरडे नी सांगीतले. परंतु त्यांच्या अडचडीमुळे नामधारी ५० हजाराच्या इसार चिठ्ठीवर ३० हजार शेकडा ५ टक्के व्याजाने इतर अटी व शर्तीवर ठरले. त्यात गैरअर्जदार म्हणेल त्या नावाने ५० हजाराची इसार चिठ्ठी स्टॅम्प पेपरवर तहसील कार्यालयात करून द्यावे, कर्ज फिटे पर्यंत दरवर्षी ५० हजाराची इसार चिठ्ठी पुन्हा काढणे, इसार चिठ्ठी नामधारी राहील, शेतीचा ताबा व वाही अर्जदाराकडे राहील. कर्जावर ५ टक्के व्याज न चुकता दरमहा द्यावे. परंतु कमलाबाईच्या अपंगत्वामूळे त्यांनी एकमुस्त रक्कम पिकावर घरपोच द्यावे असे ठरले. पैशाची गरजेमूळे सर्व अटी मान्य केल्या. त्यावेळी रामेश्वर बोबडे व मुकुंद केने उपस्थित होते. काही दिवसांनी खेरडे यांनी इसार चिठ्ठीसाठी एसडीओची परवानगी लागते. त्यासाठी लिहिलेल्या कागदावर सही घेतली. २५/०१/२००५ ला श्रीकृष्ण खेरडे व रामेश्वर बोबडे यांनी अपंग कमलबाईला चांदूर रेल्वेला नेले. अगोदरच इसार चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यावर कमलाबाईच्या सह्या घेतल्या. ३० हजार व इसार चिठ्ठीचा खर्च २ हजार असे ३२ हजार सावकारी वहीत लिहून त्यावर सही घेतली. रामेश्वर बोबडेंना ५ हजार व सोसायटीचे ७ हजार कर्ज सचिव मुकुंद केने ला दिले. उरलेले १८ हजार मुलीचे लग्न व उपचार केला. पिक निघाल्यावर मार्च २००६ मध्ये १४ महिण्याचे २२,२००रू.व्याज दिले. श्रीकृष्ण खेरडे यांनी अमदोरीला एक ८ एक्कर शेत घेतले. त्या शेतात पाणी नसल्याने त्याची विक्री होईपर्यंत १० वर्ष त्यांच्या शेताच्या विहिरीवरून पाणी द्यावे. त्या मोबदल्यात घेतलेले कर्ज व व्याज देऊ नये असे दोघामध्ये ठरले. आर्थिक अडचनीमूळे कमलबाईनी होकार दिला. १० वर्ष विहिरीचे पाणी दिले आता माझे१.३६ हेक्टर शेतीची इसार चिठ्ठी रद्द करण्याचा तगादा लावला. खेरडे ने कमलाबाई व त्यांचे मुलामुलीचे नावे असलेला ७/१२ व पेरेपत्रक दाखवले.शेत आपल्या नावे आहे असे कमलाबार्इंना वाटत होते. त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. श्रीकृष्ण खेरडे यांनी विश्वास घाताने व बेइमानीने इसार चिठ्ठीच्या नावेखाली ५० हजारात अपंग कमलबाई राऊत यांची शेती हडपली. या प्रकरणाची तक्रार कमलबाई राऊत यांनी सहाय्यक निंबधक कार्यालयाकडे केली आहे.
अवैध सावकारीच्या धाडीत सापडले पुरावे
श्रीकृष्ण खेरडे यांनी अवैध सावकारीतून अमदोरीचे भुजंग तायवाडे ची शेती हडपली. त्या प्रकरणात सहा.निबंधक कार्यालयाच्या चम्मूनी टाकलेल्या धाडीत सापडलेल्या कागदपत्रावरून या प्रकरणाचा उलगडा झाला हे विशेष.
Post a Comment