चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान /---
पेरणीसाठी बियाणे न मिळाल्याचा प्रचंड ताण आल्यामूळे हताश झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावी गुरूवारच्या दुपारी घडली. देवराव लक्ष्मणराव वानखडे असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील दोन वर्षात होतं नव्हतं ते सर्वस्व शेतीला लावले. हाती पैसा नसतांना उधारीवर कुठून तरी बियाणं मिळवून पेरणीची तयारी होती. याच आशेवर देवराव वानखडे आज सकाळी शेतात सोयाबीन व तुरीच्या पेरणीला लागले. त्यासाठी बैलजोडी सांगीतली. ऐनवेळी कोणाकडून व कुठूनही बियाण्यांचा बंदोबस्त न झाल्याचा प्रचंड ताणं त्यांच्या डोक्यावर आले.तशात अवस्थेत ते घरी परतले. घरातील मोनो विषारी औषधाची पुर्ण बाटली रिक्त करून बाजुला फेकली तेवढ्यात पत्नीला रिकामी बाटली व देवराव जमीनीवर पडलेले दिसले.ते दृश्य पाहताच तीने हंबरडा फोडला. आवाजाने शेजारी धावुन आले. त्यांनी देवराव वानखडे यांना त्वरीत ग्रामीण रूग्णालयात आनले. परंतु उपचाराआधीच देवराव यांनी प्राण सोडल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. मृतक देवराव यांच्या पश्चात दोन विवाहीत व दोन अविवाहीत मुली असुन एक मुलगी बिए ला तर दुसरी दहावीत शिकत आहे. ऐन हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्याने अशाप्रकारे मृत्युला कवटाळले संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment