सनातनवर होत असलेले आरोप हे प्राथमिक टप्प्यातील आहेत. अशा वेळी सनातनवर बंदी घालण्याची मागणी होणे हे लोकशाहीविरोधी आहे. जोपर्यंत कोणत्याही हत्येच्या प्रकरणात सनातन संस्था ही संस्था म्हणून हत्याकांडात सहभागी असल्याचे न्यायालयात सिद्ध होत नाही, तोपर्यंत तिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. जर अशी कारवाई झाली, तर ती अन्यायकारी आणि लोकशाहीविरोधी असेल !
याच पार्श्वभूमीवर विचार करायचा झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांच्याजवळचे पद्मसिंह मोहिते पाटील यांच्यावर
निंबाळकरांच्या हत्येचे आरोप आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची
हत्या करण्यासाठी त्यांनी सुपारी दिल्याचे आरोप आहेत. स्वत: अण्णा हजारे
यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी
का घातली जाऊ नये ? राष्ट्रीय जनता दलचे नेते मंहमद शहाबुद्दीन हे
हत्येच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत, तर पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव
यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. मग राष्ट्रीय
जनता दलावरही बंदी लादण्यात यावी. माकपच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांवर
बंगाल आणि केरळमध्ये अनेक संघ स्वयंसेवक आणि हिंदु नेत्यांच्या हत्यांचे
आरोप आहेत. अशावेळी माकपवरही बंदी का घातली जात नाही ?
Post a Comment