BREAKING NEWS

Sunday, July 3, 2016

तुम्हाला खुनी शोधायचे आहेत कि सनातनला खुनी ठरवायचे आहे ? - ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे

सनातन संस्थेच्या एका साधकाला अटक होताच दाभोलकर प्रकरणातील पहिली अटक असे खोटे मथळे झळकवणारी वृत्तपत्रे अथवा वाहिन्या यांची विश्‍वासार्हता नेमकी काय ? नागोरी आणि खंडेलवाल या गुंडांना अटक झाली होती आणि त्यांच्याकडून तर हत्येच्या वेळी वापरले गेलेले पिस्तुलही कह्यात घेतले होते, हे वृत्त याच प्रसिद्धीमाध्यमांनी काही वर्षांपूर्वी दिले होते ना ? मग त्याच पिस्तुलाने पुढच्या हत्या कशा झाल्या आणि आता इ.एन्.टी. स्पेशालिस्ट असलेले डॉ. वीरेंद्र सिंह तावडे यांना संशयावरून झालेल्या अटकेला या प्रकरणातील पहिली अटक असे कसे संबोधले जाते ? मग नागोरी आणि खंडेलवालची अटक कितवी होती ? त्यांचे पुढे काय झाले ? केवळ काळी हिरो होंडा ही दुचाकी आणि डॉ. दाभोलकर यांच्याविरुद्ध केलेल्या आंदोलनातील छायाचित्रात डॉ. तावडे दिसतात म्हणून ही अटक झाली, असे म्हणत असतील, तर ही कारणे हास्यास्पद नव्हेत का ? सीबीआयचा जो अधिकारी यात कार्यरत आहे, त्याच्याविरुद्ध केरळ न्यायालयाने ताशेरे झाडले आहेत आणि असा माणूस सीबीआयमध्ये कसा ?, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. असे असून आणि सनातन संस्थेने या अधिकार्‍याविरुद्ध शासनाकडे २५० पृष्ठांची तक्रार नोंदवली असतांनाही त्याच्याकडेच हा तपास सोपवला जातो, हे कसे होते ?



     एकाच संस्थेकडे सातत्याने संशयाची सुई का वळते, या प्रश्‍नाचे उत्तर अगदी सोेपे आहे. प्रत्येक हत्येच्या वेळेला सनातनच्या विरोधात पुरोगाम्यांनी आरडाओरडा केला आणि सतत दबाव निर्माण केला. पोलिसांना त्यांचे काम करणे अवघड केले. त्याच विचारांचे लोक माध्यमांमध्ये आहेत, तेव्हा त्यांनी या पुरोगाम्यांची तळी उचलून धरली. यात नेमके खुनी शोधायचे आहेत कि सनातनला खुनी ठरवायचे आहे, असा प्रश्‍न जाणत्या लोकांच्या मनात उभा राहिला, तर नवल नाही. सनातनच्या साधकाला अटक झाली म्हणून संस्थेवर बंदी आणा !, असे म्हणणारे, संजय दत्त शिक्षा भोगायला तुरुंगात गेला तेव्हा चित्रपटसृष्टीवर बंदी घाला, असे का म्हणत नव्हते ? राजकीय पक्षाचे लोक वा अनुयायी आत जातात, तेव्हा त्या पक्षांवर बंदी घाला, असे म्हणतांना यांची दातखीळ बसते का ?

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.