सनातन संस्था गेल्या ५ वर्षांपासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन करत आहे. अधिवेशनांच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन उभे राहून वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना झालेली षड्यंत्रकारी विदेशी लोकांना, निधर्मी संघटनांना नको आहे. तसे झाले तर त्यांना राजकारण करता येणार नाही. त्यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी हे मानवताविरोधी लोक सनातनवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. त्यांना सनातन हिंदु धर्म उभा राहिलेला नको आहे.
वर्ष २००९ मध्ये कर्णावती (अहमदाबाद) जवळ असलेल्या संत आसारामजी
बापूंच्या मोटेरा आश्रमाचे कोम्बिग ऑपरेशन करण्यात आले. माळा जपणार्या,
अनेक वर्षे मौन व्रत धारण करणार्या आमच्या २४९ साधकांवर गुंड असल्याचे
आरोप करत त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी कोम्बिंग
ऑपरेशन लाईव्ह दाखवून आमची नाचक्की केली. पुढे वर्ष २०१५ मध्ये आमचे सर्व
२४९ साधक निर्दोष सुटले. न्यायालयाने निकालात म्हटले, माळा ओढणारे आणि
ईश्वराचा नामजप करणारे गुंड कसे असू शकतात ? त्यांच्यावर एवढ्या खालच्या
थराचा आरोप पोलिसांनी कसा काय केला ? या निकालाविषयी प्रसारमाध्यमांनी एक
चकार शब्दही काढला नाही. प्रसारमाध्यमे पूर्णत: विकली गेली आहेत.
पोलीस यंत्रणा, शासन आणि प्रसारमाध्यमे यांनी या आधी प.पू.
आसारामबापूंच्या संप्रदायाला संपवण्याचे अतोनात प्रयत्न केले. आता ते
सनातनच्या पाठीमागे लागले आहेत. सनातन धर्म सनातन आहे. इतिहासात सनातन
धर्माला नष्ट करणारे नष्ट झाले. हिंदूंमध्ये असलेल्या संघटनाच्या
अभावामुळेच हिंदु संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकटे पाडून त्यांच्यावर
बंदी घालण्याचे प्रयत्न होत आहेत. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र हवे असेल
तर आपल्याला संघर्ष हा करावा लागणारच आहे. अखेर विजय हा सत्याचाच, रामाचाच
होईल. ही रामाची पावन भूमी आहे.
Post a Comment