हिंदु धर्माचे आचरण आणि हिंदु संस्कृती यांचा प्रचार करणार्या सनातन
संस्थेचा पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणांशी संबंध जोडणे चुकीचे आहे.
सनातन संस्था ही हिंदु धर्म आणि संस्कृतीची शाळा आहे. या संस्थेवर बंदी
घातली, तर संपूर्ण समाजासह हिंदुत्वाची मोठी हानी होईल. त्यामुळे सनातन
संस्थेवर अजिबात बंदी घालण्यात येऊ नये. हिंदु धर्माचे आचरण कसे करावे,
याचे उत्तम मार्गदर्शन ही संस्था करते. तसेच याचा तरुण पिढीलाही मोठा लाभ
होणार असल्याने ही संस्था तरुण पिढीला हवी आहे. पुरोगाम्यांना हिंदु
धर्मासह इतर धर्मांतील विचार चुकीचे वाटत असतील, तर त्यांनी त्या त्या
धर्मातील कायदे पंडित, धर्मगुरु यांच्याशी चर्चा केली पाहिजे. वरील तिन्ही
हत्या प्रकरणी पोलिसांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे साप साप
म्हणून भूमीला (सनातनला) धोपटण्याचा प्रकार पुरोगामीवाल्यांनी करू नये.
पदवी घेतलेल्या पुरोगाम्यांनी हिमालयात जाऊन साधना करावी, हिंदु
धर्मग्रंथांचा अभ्यास करावा. त्यानंतर त्यांना खर्या अर्थाने अध्यात्माचे
महत्त्व पटून त्यांचा वाल्याचा वाल्मीकि होईल !
Post a Comment