ढाका - बांगलादेशची राजधानी ढाका शहरातील गुलशन परिसरातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये १ जुलैच्या रात्री साडेनऊ वाजता इसिसच्या आतंकवाद्यांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा देत आक्रमण केले. त्यांनी बॉम्बस्फोट आणि गोळीबार करत हे आक्रमण केले. त्यांच्याशी १३ घंटे चाललेल्या चकमकीनंतर ६ आतंकवाद्यांना ठार करण्यात बांगलादेशच्या कमांडोंना यश आले. यामुळे ओलीस ठेवलेल्या परदेशी नागरिकांसह १८ जणांची सुटका झाली. यात एका भारतीय नागरिकासह जपान, अर्जेंटिना, इटली या देशांतील नागरिकांचाही समावेश होता.
मात्र आतंकवाद्यांच्या आक्रमणात २० विदेशी नागरिक ठार झाले. यात तारिषी जैन नामक एका भारतीय तरुणीचा समावेश आहे. आतंकवाद्यांनी विदेशींना शोधून त्यांचे गळे चिरून आणि गोळ्या झाडून त्यांच्या हत्या केल्या. या आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले असले, तरी बांगलादेश पोलिसांनी अद्याप अधिकृतरित्या ते स्पष्ट केलेले नाही. या रेस्टॉरंटमध्ये प्रामुख्याने परदेशी नागरिकांचा वावर अधिक असतो. या परिसरातच अनेक देशांचे दूतावास आहेत. या परिसरात भारतीय दूतावासही आहे. भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुखरुप आहेत.

Post a Comment