BREAKING NEWS

Wednesday, July 20, 2016

नितीन गवळींच्या उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी झुकले प्रशासन. अखेर शहरातील विविध समस्या होणार दुर. एसडीओ, मुख्याधिकारी यांनी ज्युस पाजुन सोडविले उपोषण.

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-/



सद्यस्थितीत चांदुर रेल्वे शहर समस्यांचे माहेरघर बनले असतांना एकमेव अपक्ष नगरसेवक असलेले नितीन गवळी यांनी थेट बेमुदत उपोषण सोमवारपासुन सुरू केले होते. मात्र उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी प्रशासनाला झुकावे लागले असुन सर्व मागण्या मान्य करून उपविभागीय अधिकारी विधाते, मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी ज्युस पाजुन नितीन गवळींचे उपोषण सोडविले.

   शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. याला त्रस्त शिक्षण, आरोग्य व स्वच्छता सभापती  नितीन गवळी यांनी सोमवारपासुन नगरपरीषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.  पहिल्याच दिवशी विविध पक्ष, संघटनांनी उपोषणस्थळी भेट देवुन आपला पाठिंबा दर्शविला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी उपविभागीय अधिकारी श्री विधाते, मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली व चर्चा केली. नगरसेवक नितीन गवळी यांच्या उपोषणाच्या मागण्यांमधील म्हाडा घरकुल योजनेच्या मंजुर लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात येत आहे,  अपंगांना ३% निधीतुन साहित्याचे वाटप १२ जुलै रोजी करण्यात येणार होते मात्र अर्ज उपलब्ध नसल्यामुळे अपंगांना साहित्याचे वाटप २२ जुलै रोजी करण्यात येणार आहे, मंगलमुर्ती नगर मधील समाज मंदिराच्या कामाची ई- निवीदा प्रसिध्द झाली असुन लवकरच कामाला सुरूवात होणार आहे, प्रवासी निवाऱ्याचे काम मंगळवारपासुनच सुरू झाले असुन १ महिन्यात कामे पुर्ण होणार आहे, डंपींग हाउसवरील कामाचे अद्याप एकही देयके कंत्राटदाराला अदा करण्यात आले असुन कामाचे मुल्यांकन केल्यानंतरच कामाचे देयके अदा करण्यात येईल, शेंद्रीपुरा येथील पाईपलाईनचे कामाच्या तांत्रीक मंजुरीसाठी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अमरावतीला पाठविण्यात आले अाहे, आठवडी बाजारातील कामे लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे. या सर्व मागण्या पुर्ण झाल्या असुन याचे लेखी आश्वासनही मुख्याधिकारी ठाकरे यांनी नितीन गवळींना दिले. या संपुर्ण चर्चेनंतर अखेर उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी नितीन गवळींना ज्युस पासुन उपोषण सोडविले. शहरवासीयांच्या मागण्यांसाठी थेट उपोषण करून समस्या सोडविणारे नितीन गवळी हे ऐकमेव नगरसेवक ठरले आहे.
           यावेळी माजी आमदार डॉ. श्री पांडुरंग ढोले, नगरसेवक मेहमुद हुसैन, नगरपरीषदचे कर्मचारी श्री चौबे, सामाजिक कार्यकर्ते श्री गौतम जवंजाळ, कॉ. श्री विनोद जोशी, अैड.श्री राजीव अंबापुरे,श्री विनोद लहाने, श्रीअजय हजारे, श्रीधनराज गजभिये,श्री निलेश कापसे यांसह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, शहरवासी आदी प्रामुख्याने उपस्थित होते..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.