भोपाळ - मध्यप्रदेशमधील शहडोल जिल्ह्यातील ख्रिस्ती
मिशनर्यांद्वारे चालवण्यात येणार्या गुड शेफर्ड कॉन्व्हेंट शाळेत १
जुलैपासून भारत माता की जय म्हणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी
विद्यार्थ्यांना गुड शेफर्ड कॉन्व्हेंट शाळेच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास
सांगितले आहे. शाळेच्या प्रशासनाच्या या निर्णयानंतर पालकांनी अप्रसन्नता
व्यक्त केली आहे. यानंतर व्यवस्थापनाने या आदेशाला स्थगिती दिली आहे.
शाळेचे व्यवस्थापन केरळमधील कार्मेल कॉन्व्हेंट नावाच्या संस्थेकडून केले जाते. त्यांचे मुख्यालय देहलीत आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा शिक्षणाधिकारी उमेश धुर्वे यांनी सांगितले की, अशा प्रकारे बंदी घालणे अयोग्य आहे. घटनेचा तपास केला जाईल आणि तक्रार योग्य असल्यास शाळेवर कडक कारवाईही केली जाईल.

Post a Comment