रामनाथी, १३ जुलै (वार्ता.) -
पणजी, गोवा येथून प्रसिद्ध होणार्या दैनिक लोकमत या मराठी वृत्तपत्राने १९ जून २०१६ दिवशीच्या अंकात सनातनी... नव्हे ! विकृत ! या मथळ्याखाली मानहानीकारक लेख प्रकाशित करून सनातन संस्थेची मानहानी केली. या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत १० कोटी रुपये मानहानीभरपाई मागणीची कायदेशीर नोटीस लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रशासक यांना बजावली आहे.
या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक लोकमतचे संपादक श्री. राजू नायक यांनी सनातनी... नव्हे ! विकृत ! या मथळ्याखाली मानहानीकारक लेख लिहून तो दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या १९ जून २०१६ या दिवशीच्या अंकाच्या हॅलो रविवार पुरवणीत प्रसिद्धी केला. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली आहे. यासाठी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक, मालक, लोकमत मिडिया प्रा.लि. मुद्रक आणि प्रकाशक श्री. बालाजी मुळे यांच्या विरोधात मानहानीभरपाईपोटी १० कोटी रुपये नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत देण्याची मागणी करणारी कायदेशीर नोटीस बजावली आहे. हानीभरपाईची रक्कम १० दिवसांच्या मुदतीत न दिल्यास हानीभरपाई वसूल करण्यासाठी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात येईल आणि तसे करावे लागल्यास दाव्याच्या खर्चात होणार्या सर्व खर्चाला आणि होणार्या सर्व परिणामांस आपणास (लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रशासक यांना) उत्तरदायी धरण्यात येईल, अशी समज या नोटिशीतून देण्यात आली आहे, तसेच कायदेशीर नाटिशीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही आपलेच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment