नवी देहली - जो कोणी सौदी अरेबियाला जाऊन डॉ. झाकीर नाईक यांचे शिर
कापून आणील, त्याला ५० लक्ष रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, अशी घोषणा
विश्व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केली आहे. पत्रकारांशी
बोलतांना साध्वी म्हणाल्या, धर्मोपदेशकाच्या नावावर झाकीर नाईक हे
आतंकवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन जर कुणी
आतंकवादी बनत असेल, तर हे कसले धर्मोपदेशक आहेत ? झाकीर यांच्यासारख्या
धर्मोपदेशकाची केंद्रशासनाने चौकशी केलीच पाहिजे.
Post a Comment