नगर, -
पॉर्न संकेतस्थळामुळे समाज बिघडत चालला आहे. युवावर्गामध्ये विकृतीचे प्रमाण वाढत असून त्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे. बलात्कारासह लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशात पॉर्न संकेतस्थळांवर पूर्णतः बंदी आणली पाहिजे. त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक ते पालट करणेही आवश्यक आहे, अशी मागणी इंदूरचे राष्ट्रसंत प.पू. भैय्यूजी महाराज यांनी नगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावी वार्ताहरांशी बोलतांना केली. राष्ट्र्रसंत प.पू. भैय्यूजी महाराज आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २२ जुलैला सायंकाळी कोपर्डी येथे बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी अशा अप्रिय घटनांमध्ये समाविष्ट असणार्यांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाईची आवश्यकता प्रतिपादित केली. या वेळी हिवरे बाजारचे पोपटराव पवार, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment