BREAKING NEWS

Monday, July 25, 2016

आम्ही सनातनच्या पाठीशी ठामपणे उभे राहू ! - मंत्र्यांचा निर्वाळा

मुंबई, --    -



कोणताही ठोस पुरावा नसतांना केवळ षड्यंत्राद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या निरपराध साधकांना अटक करण्यात आली आहे. यात हिंदुद्रोही प्रसिद्धीमाध्यमांना हाताशी धरून खोट्या बातम्यांद्वारे समाजात सनातनची मानहानी केली जात आहे. त्यातून पुढे सनातनवर बंदी आणण्याचे षड्यंत्रही काही हिंदुद्रोही आणि पुरोगामी यांनी आखलेले आहे. अशा वेळी कठीण प्रसंगात आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्‍वासन राज्यातील शिवसेना आणि भाजप पक्षांतील विविध मंत्र्यांनी सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाला दिले.
        सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर, समितीचे राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि समितीचे पदाधिकारी श्री. सतीश सोनार यांनी विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. यात शिवसेनेचे परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते, उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंपदा राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे, महसूल राज्यमंत्री श्री. संजय राठोड, पशूसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री श्री. अर्जुन खोतकर, सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील, आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, तसेच भाजपचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे, आदिवासी विकासमंत्री श्री. विष्णु सावरा, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. गिरीश महाजन, कृषीमंत्री श्री. पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख, रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री श्री. जयकुमार रावल, परिवहन राज्यमंत्री श्री. विजयकुमार देशमुख आणि आमदार श्री. संजय केळकर यांची भेट झाली. या भेटीत बहुतांश लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
        प्रसिद्धीमाध्यमांमध्ये सनातनविषयी खोट्या बातम्या छापून समाजात चुकीची प्रतिमा कशी निर्माण केली गेली आणि कसा अन्याय केला जात आहे, हे सदर लोकप्रतिनिधींना विविध पुरावे आणि निवेदन देऊन सांगण्यात आले. या वेळी अनेक मंत्र्यांनी आम्ही सनातन संस्थेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक भेटून अन्याय रोखण्याविषयी सांगू, असे सांगितले. तर काहींनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सनातनवर अन्याय्य कारवाई केली जाऊ नये, असे सांगणार असल्याचेही सांगितले. काही मंत्र्यांनी पक्षाच्या बैठकीत याविषयी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगितले. अनेकांनी सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट देण्यासाठी येऊ, असेही सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.