बेळगाव, - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांच्या खुनाचे अन्वेषण राजकीय इच्छाशक्तीअभावी रेंगाळले आहे. या अन्वेषणाला गती मिळावी, यासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन छेडून शासनावर दबाव घालण्यात येणार आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी. याचसमवेत कर्नाटकमध्येही (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा संमत करण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रामलिंग खिंड गल्ली येथील अंनिसच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पाटील पुढे म्हणाले की, वरील तिन्ही खुनांचे अन्वेषण जलदगतीने होण्यासाठी विविध माध्यमांतून शासनावर दबाव आणण्यात आला आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असलेल्या या अन्वेषणाला न्यायालयाने शासनाला चांगलेच खडसावले आहे. त्यामुळे अन्वेषणाविषयी गती मिळाली आहे; मात्र या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. संशयितांना अटक करून अन्वेषण चालू असले, तरी राजकीय इच्छाशक्तीअभावी या प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावण्यात शासन अपयशी ठरत आहे. यास्तव शासनावर दबाव आणून या प्रकरणाचे अधिक जलदगतीने अन्वेषण करण्यासाठी २० जुलैपासून देहली येथे या आंदोलनाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात २० ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांत आंदोलने करण्यात येणार आहेत. हिंसाके खिलाफ, मानवता की ओर, असे या आंदोलनाला संबोधण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या मारेकर्यांचे अन्वेषण करण्यात गती देण्यात आली आहे, त्याप्रमाणेच कर्नाटकातही कलबुर्गी यांच्या मारेकर्यांचा शोध लावण्यात यावा. या तिन्ही प्रकरणांमागे साम्य आहे. यासाठी बेळगाव शाखेद्वारे जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि कायदामंत्री यांची भेट घेण्यात येणार आहे.

Post a Comment