पुणे, -- -
सध्याची मेकॉलेने दिलेली शिक्षणपद्धती ही स्वाभिमान गमवायला लावणारी आहे. आताची शिक्षणपद्धत जीविकेचे ज्ञान देणारी आहे. जीवनाचे ज्ञान अत्यावश्यक असून ते आपल्याला केवळ धर्मातून मिळते. सध्या जेवढे शिक्षण जास्त होते, तेवढा माणूस माणुसकीपासून दूर जातो. त्यामुळे माणुसकी शिकवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. जन्माचे कल्याण करायचे असेल, तर संतांच्या साहित्याविना पर्याय नाही, असे मार्गदर्शक प्रतिपादन प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले. ओंकार ट्रस्टच्या वतीने ३० जून या दिवशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सरदेशपांडे, विश्वस्त श्री. ज्ञानेश पुरंदरे उपस्थित होते. या वेळी प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन आणि वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार श्री. विशाल जगताप यांना प्रदान करण्यात आला.

Post a Comment